Tuesday, July 9, 2024

‘बिग बॉस ओटीटी’ विजेती दिव्या अग्रवालने वरुण सूदसोबत केले ड्रीम होम खरेदी, फोटो केले शेअर

‘बिग बॉस ओटीटी’ची ट्रॉफी जिंकल्यापासूनच दिव्या अग्रवाल चर्चेत आहे. शो दरम्यान, वरुण सूदसाठी दिव्याच्या मनातील भावना प्रेक्षकांना दिसली. आता या जोडप्याने स्वतःसाठी स्वप्नवत घर विकत घेतले आहे. दोघेही अनेक दिवसांपासून त्यांच्या स्वप्नातील घर घेण्याच्या प्रयत्नात होते, अशी चर्चा आहे.

प्रत्येकाला आयुष्यात स्वतःसाठी स्वप्नातल घर बनवायचे असते, जिथे तो त्याच्या जवळच्या लोकांसोबत राहू शकतो. दिव्यानेही (Divya Agarwal) वरुण सूदसोबत अशा घराचे स्वप्न पाहिले होते जे आता पूर्ण झाले आहे. घर खरेदीची आनंदाची बातमी दिव्याने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तिने वरुण आणि स्वतःचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये दोघेही हातात घराचे मॉडेल घेऊन एकमेकांच्या डोळ्यात पाहत आहेत. दोघांचा आनंद फोटोमध्ये दिसत आहे.

दिव्या अग्रवालने वरुण सूदसोबत घर केले खरेदी

दिव्याने फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, “माझ्या आई-वडिलांनी मला इतके सक्षम बनवले की, मी नंतर माझे स्वत:चे साम्राज्य उभे करू शकेन. ही बातमी तुमच्यासोबत शेअर करताना आम्हाला आनंद होत आहे की, आम्ही आमचे स्वतःचे घर विकत घेतले आहे.” बॉयफ्रेंड वरुणचा उल्लेख करताना ती म्हणते, “वरूण आणि मी आयुष्यात छोट्या-छोट्या गोष्टी मिळवल्या, ज्याने मिळून मोठे बनवले. १४०५- दिव्या, १५०५- वरुण.”

सेलेब्सने दिव्या आणि वरुणचे केले अभिनंदन

असाच एक फोटो वरुण सूदने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. त्यांनी सांगितले की, त्यांचे घर १४ वा आणि १५वा मजला एकत्र करून बनवला आहे. दिव्याने २ दिवसांपूर्वी ही पोस्ट शेअर केली होती, ज्यावर २ लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत. सर्व सेलिब्रिटी या जोडप्यावर कमेंट करत आहेत आणि नवीन घरासाठी त्यांना शुभेच्छा देत आहेत.

वरुण आणि दिव्या त्यांच्या नात्याबद्दल आहेत सिरियस

वरुणनेही आपल्या पोस्टवर हार्ट इमोजी शेअर करून आपले प्रेम व्यक्त केले आहे. दिव्या जेव्हा ‘स्प्लिट्सविला’ या रियॅलिटी शोचा भाग होती, तेव्हा तिची वरुण सूदशी जवळीक वाढली होती. दोघेही अनेकदा इंस्टाग्रामवर एकमेकांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. ते त्यांच्या नात्याबद्दल खूप सिरियस आहेत. दिव्याने डान्सर टेरेन्स लुईसच्या मार्गदर्शनाखाली डान्स शिकला आहे. ती व्यवसायाने कोरिओग्राफर आहे. तिची एक डान्स इंस्टीट्यूट आहे. तिने अनेक सौंदर्य स्पर्धा जिंकल्या आहेत.

हेही वाचा-

हे देखील वाचा