Wednesday, July 3, 2024

जरा इकडे पाहा! सेटवट अशाप्रकारे कपिल शर्मा करताे टाईमपास, पाहा व्हायरल व्हिडिओ

लाेकप्रिय कपिल शर्मा एक उत्तम कॉमेडियन आहे. ताे कायमच त्याच्या अभिनयाने, काॅमेडीने आणि गायनाने चाहत्यांचे मनाेरंजन करताे. कपिलने आपल्या कॉमेडी व्यतिरिक्त अनेक वेळा आपल्या गायनाचे कौशल्य देखील दाखवले आहे. ‘द कपिल शर्मा शो‘मध्ये अनेकदा कपिल गाताना दिसला आहे. कपिलची ही स्टाईलही प्रेक्षकांना खूप आकर्षित करणारी आहे. आता अलीकडेच कपिल शर्माने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून ‘द कपिल शर्मा शो’च्या सेटवरील त्याचा सर्वात आवडता टाइमपास उघड केला आहे.

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये कपिल शर्मा (kapil sharma) दिग्गज गायक जगजीत सिंग यांची लोकप्रिय गझल ‘कोई फरियाद’ गाताना दिसत आहे. त्याच्या या व्हिडिओने त्याच्या चाहत्यांची मने जिंकली आहेत. कपिलचे चाहते त्याच्या या व्हिडिओवर भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये कपिल शर्माने लिहिले की, “सेटवरचा आवडता टाईमपास.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

कपिलच्या अनेक चाहत्यांनी त्याचे कौतुक करत कमेंट केल्या आहेत. कपिलचा एक चाहता कमेंट करत लिहिले की, “कपिल सेटवर असेल तर प्रेक्षक कधीही कंटाळू शकत नाहीत.”

नुकतेच जान्हवी कपूर आणि बोनी कपूर ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सहभागी झाले होते. जान्हवी कपूर तिच्या ‘मिली’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान या शोमध्ये सहभागी झाली होती. जान्हवीने शोमध्ये सांगितले की, “तिला नेहमीच कपिल शर्माच्या शोमध्ये यायचे होते.”

कपिलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, कपिल शर्मा लवकरच नंदिता दासच्या ‘झ्वीगाटो’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात कपिल शर्माने फूड डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीची भूमिका साकारली आहे. (tv kapil sharam shares glimpse of his favourite time pass from set of the kapil sharma show)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
निम्रत कौर अहलुवालियाने प्रियंका चौधरीला केली शिवीगाळ? पाहा व्हायरल व्हिडिओ

अरे वाह! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माेठी घोषणा, मुंबईत बनणार फिल्म सिटी

हे देखील वाचा