Monday, October 14, 2024
Home टेलिव्हिजन निम्रत कौर अहलुवालियाने प्रियंका चौधरीला केली शिवीगाळ? पाहा व्हायरल व्हिडिओ

निम्रत कौर अहलुवालियाने प्रियंका चौधरीला केली शिवीगाळ? पाहा व्हायरल व्हिडिओ

छाेट्या पडद्यावरील लाेकप्रिय शाे ‘बिग बॉस 16‘ सध्या खूप चर्चेत असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या शोमध्ये प्रेक्षकांना मारामारी, रोमान्स, ड्रामा, सर्वकाही पाहायला मिळते. अशा परिस्थितीत शोचे निर्माते आगामी भागाचा प्रोमो शेअर करून प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवतात. ‘बिग बॉस 16’ च्या आगामी भागात प्रेक्षकांना चांगलाच ड्रामा पाहायला मिळणार आहे. लवकरच प्रसारित होणाऱ्या या एपिसोडमध्ये  प्रियंका चौधरी आणि निम्रत कौर यांच्यात बाचाबाची पाहायला मिळणार आहे.

कलर्स टीव्हीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये हे दोन्ही स्पर्धक जोरदार वाद घालताना दिसत आहेत. प्रियांका चौधरी (Priyanka Chudhary) आणि निम्रत कौर अहलुवालिया (Nimrat Kaur Ahluwali) याआधी ‘बिग बॉस 16′(Big Boss) मध्ये वाद घालताना दिसल्या होत्या पण यावेळी दोघेही आपल्या भांडणात अनेक मर्यादा ओलांडताना दिसणार आहेत. निम्रत आणि प्रियांका याआधीही जेवणावरून वाद घालताना दिसल्या आहेत. प्रियांकाने जेवण कमी मिळण्यावर आवाज उठवला, ज्यावर निम्रत तिला चीप म्हणते.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

निम्रत आणि प्रियांका चाैधरीमध्ये जेवणावरून वाद वाढताे आणि हाणामारीवर उतरताे. यासोबतच निम्रत प्रियांकासाठी अश्लिल भाषा वापरताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये, प्रियांका टीना दत्तासोबत तिला आणि अंकित गुप्ता यांना दिल्या जाणाऱ्या जेवणाबद्दल बोलत आहे. तिला कमी जेवण मिळत असल्याची तिची तक्रार आहे. त्यावरून तिचा आणि निम्रतचा वाद होतो वाद इतका वाढताे की, हाणामारीपर्यंत पोहोचताे.

प्रियांका चौधरी आणि अंकित गुप्ता यांच्यात देखील या मुद्द्यावरून थोडा वाद झाला आहे, परंतु दाेघींनीही परस्पर बाेलून हे समीकरण साेडवले हाेते. आता प्रियांका आणि निम्रत यांच्यातील भांडण कोणते वळण घेते हे पाहण्यासाठी चाहते आतूर  आहेत. (tv bigg boss 16 nimrat kaur ahluwali abuses priyanka chudhary in a fight over food)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जीवलगा! समंथाच्या आजाराची माहिती मिळताच नागा चैतन्यने केला फोन; म्हणाला, ‘काही मदत…’

शाेयबसाेबत लग्न बंधनात अडकण्यापूर्वी सानियाचा माेडला हाेता साखरपुडा, वाचा सविस्तर

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा