Friday, July 5, 2024

फॅन मूव्हमेंट! मनित जौरा म्हणाला,’संजय दत्तला पाहून…’

टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता मनित जौरा याने ‘कुंडली भाग्य‘ या मालिकेतील ऋषभ लुथरा याची भूमिका साकारून चाहत्यांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. नुकतेच मनितने एका मुलाखतीत त्याच्या कारकिर्दीबद्दल आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आणि यादरम्यान त्याने एका पुरस्कार सोहळ्यात त्याच्या कामगिरीदरम्यान झालेल्या अपघाताबद्दलही सांगितले.

झाले असे की, झी रिश्ते अवॉर्ड्समध्ये परफॉर्मन्सदरम्यान मनितला आग लागली होती. मात्र, त्यानंतरही तो थांबला नाही आणि त्याने आपला परफॉर्मन्स सुरूच ठेवला. या घटनेबद्दल बोलताना मनित म्हणाला की, ” माझ्या ड्रेसमध्ये आग लागल्याची जाणीव होताच मी काही काळ आपला परफॉर्मन्स चालू ठेवला कारण या एका परफॉर्मन्ससाठी संपूर्ण टीमने किती मेहनत घेतली होती हे मला माहीत होते. आणि मला माझ्या टीमवर पूर्ण विश्वास होता की, कोणताही अपघात होण्यापूर्वी टीम या संपूर्ण प्रकरणाला नियंत्रणात आणेल.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Manit Joura (@manitjoura)

मनित म्हणतो, “मी परफॉर्मन्स मध्येच सोडला असता, तर तासनतास मेहनत घेतली असती. मात्र, इथे संपूर्ण टीमचा विषय होता. माझा त्याच्यावर विश्वास होता आणि त्यांचा माझ्यावर.” दोन वर्षांपूर्वी अचानक कुंडली भाग्य सोडण्यामागचे कारण सांगताना मनित म्हणाला,आम्हाला अचानक कळले की, “आईला ब्रेन ट्युमर आहे आणि कुटुंबातील सर्वात मोठा मुलगा असल्याने तिची काळजी घेणे, कठीण प्रसंगी तिच्यासोबत राहणे ही माझी जबाबदारी होती. त्यामुळे कठीण काळात मी माझ्या कुटुंबासोबत राहण्याचा निर्णय घेतला. जेव्हा मी याविषयी निर्मात्यांशी बोललो तेव्हा त्यांनी मला पाठिंबा दिला आणि 3-4 महिन्यांनंतर सर्वकाही व्यवस्थित झाल्यावर त्यांनी मला परत कामावर येण्याची संधी दिली.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Manit Joura (@manitjoura)

त्याच्या फॅन मूव्हमेंटबद्दल मनित म्हणाला,”मी संजय दत्त सरांचा खूप मोठा चाहता आहे. मला आठवते की, मी जेव्हा एका पार्टीला गेलो होतो, तेव्हा दत्त साहेब यांनी एंट्री मारली आणि मला सगळे थांबल्यासारखे वाटले. सगळ्यांचे लक्ष त्याच्याकडे होते. मी अनेक अभिनेत्यांसोबत काम केले आहे, पण प्रत्येकासोबत फोटो काढत नाही. मात्र, मी त्यांच्याकडे गेलो, त्यांना मिठी मारली आणि त्याच्यासोबत एक फोटोही काढला. याशिवाय जॉन अब्राहमसोबतही माझा एक फोटोही आहे. माझ्यासाठी तो एक शानदार अनुभव होता.”

मनित जौरा अनेक टीव्ही मालिकांचा भाग राहिला आहे. मनित ‘नागिन 6’ मध्येही एक महत्त्वाची भूमिका साकारत होता, पण आता अलीकडेच त्याने या शोला अलविदा केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा –
शरद पवारांचे हिंदी चित्रपटसृष्टीबद्दल मोठे वक्तव्य; म्हणाले, ‘सगळ्यात जास्त योगदान मुस्लिमांचेच…’
नेहा मलिकने ब्लू ड्रेसमध्ये केले बोल्ड फोटोशूट

हे देखील वाचा