Sunday, December 8, 2024
Home टेलिव्हिजन नोएडा येथील ट्विन टावर्समध्ये ‘या’ अभिनेत्याने गुंतवला हाेता पैसा, बिल्डिंग पाडण्यावर म्हणाला…

नोएडा येथील ट्विन टावर्समध्ये ‘या’ अभिनेत्याने गुंतवला हाेता पैसा, बिल्डिंग पाडण्यावर म्हणाला…

झी टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका ‘कुंडली भाग्य’ यातील ऋषभची भुमिका साकारणारा अभिनेता मनित जौरा याचे नोएडा येथील ट्विन टावर्समध्ये दाेन फॅल्टस हाेते. ट्विन टावर्स पाडल्यानंतर अभिनेत्याला देखील चांगलाच झटका बसला आहे. गौरतलब येथील सुप्रीम कोर्टने सुपरटेकची बिल्डिंग ‘ट्विन टावर’ पाडण्याचे ऑर्डर दिले हाेते. ज्यानंतर 28 ऑगस्ट 2022 राेजी त्याला सर्वाच्या सुरक्षेतेची दक्षता पाळत पाडण्यात आले. यामुळे अभिनेत्याबराेबर बाकी लाेकांनाही झटका बसला ज्यांनी फ्लॅटस खरेदी केले हाेते. यासंबधी मनित जौराची प्रतिक्रीया आली आहे.  

मनितने एका मुलाखतीत खुलासा केला की, त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी दाेन फॅल्टस घेतले हाेते. त्यांनी एक फॅल्ट 2011 मध्ये तर दुसरा फॅल्ट 2013 मध्ये इनवेस्टमेंटच्या स्वरुपात घेतला हाेता. त्यावेळी आम्हाला माहित नव्हते की, बिल्डरच्या विराेधात काही मुद्याला घेऊन कायदेशीर कारवाई हाेत आहे. याबाबतीत माहिती मिळवण्याचा आमचा अधिकार हाेता. मात्र, याबाबत कुणीही आम्हाला कुठलीही माहिती दिली नाही.

मनितने आठ वर्षापुर्वी बिल्डरच्या विराेधात तक्रार दाखल केली हाेती. मनित पुढे म्हणाला- “ज्यावेळी आम्हाला त्यांच्या विराेधात हाेत असलेल्या कायदेशीर कारवाई विषयी कळले त्यावेळी आम्ही एक प्रमुख वकीलाला नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. आम्ही आमचा गुतंवलेला पैसा वापस मिळवु इच्छिताे. इतके वर्ष माझ्या वडीलांना काेर्टच्या पायऱ्या चढाव्या लागल्या यासाठी मला फार वाईट वाटले. आपल्या देशात घर एक फ्लॅट नसून त्या भावना असतात. त्याचप्रमाणे माझ्या वडीलांनी देखील एका छान जागी घर घेण्याचे स्वप्न पाहीले. मात्र, असे हाेऊ शकले नाही. सुप्रीम कोर्टने निर्णय घेतला की, बिल्डरला खरीदी दारीना दिल्या गेलेल्या राशिवर व्याज द्यावे लागेल. परंतु त्यानी काही महिनेच असे केले. अभिनेत्याचे हे देखील म्हणणे आहे की, त्यांनी माेठी रक्कम देऊन  फ्लॅटस विकत घेतले हाेते ज्याची रक्क्म त्याना परत मिळाली नाही.

मनित जौराने सांगितले, जेव्हा ट्विन टॉवर्स पाडण्यात आले तेव्हा त्यांना फार दुख झाले. अभिनेता म्हणाला, हे दुखदायी हाेते. मी ना बिल्डिंग्स पाडण्याचा व्हिडीओही बघितला आणि ना आई – बाबांसाेबत याविषयी चर्चा केली. आम्हाला बिल्डर कडुन काही राशि मिळाली जी काेर्टने देण्याचा आदेश दिला हाेता. परंतु ती राशी बाजारात असलेल्या फ्लॅटच्या किंमतीच्या तुलनेत फार कमी आहे. मी त्या रक्कमसाठी समाधानी नाही. मात्र, ठीक आहे की, विवाद संपला आणि आम्ही  पुढे गेलाे आहाेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-‘लायगर’चित्रपट प्लॉप ठरल्यामुळे विजय देवरकोंडाने घेतला मोठा निर्णय; म्हणाला, ‘चित्रपटाच्या नुकसान भरपाईसह मानधन ही…’
प्रत्येक विकेंडला सोनू सूदच्या घराबाहेर गरजूंच्या रांगा; नेटकरी म्हणाले,’खान मंडळीनी…’
जगासाठी खलनायक लेकीसाठी हिरो! शक्ति कपूर यांच्या वाढदिवशी श्रद्धा कपूरची स्पेशल पोस्ट

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा