‘भाभीजी घर पर है’ मधुन शुभांगी अत्रेला खूप चांगली ओळख मिळाली. टीव्हीवर साडी घेऊन नेहमीच डोक्यावर पदर घेतलेली ‘अंगुरी भाभी’ खऱ्या आयुष्यात खूपच स्टायलिश आहे. ११ एप्रिल रोजी शुभांगी अत्रे तीचा ४० वा वाढदिवस साजरा करत आहे.
शुभांगी अत्रेने बर्याच टीव्ही शोमध्ये काम केले आहे. परंतु, ‘अंगुरी भाभी’ बनून ती घराघरात पोहचली. ४० वा वाढदिवस साजरा करणार्या शुभांगीचे वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी लग्न झाले होते. ११ एप्रिल १९८१ रोजी ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या शुभांगीला लहानपणापासूनच अभिनेत्री व्हायचे होते, परंतु तिला संधी मिळाली नाही. शुभांगीने एका मुलाखतीत सांगितले होते की, लग्नानंतर तिचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले.
शुभांगी एक अशी अभिनेत्री आहे, जिने लग्नानंतर तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली. २००० साली तिचे लग्न पेशाने व्यावसायिक असलेल्या पीयूष पुरीसोबत झाले. या जोडप्याला ‘आशी’ नावाची १४ वर्षांची मुलगी आहे. आशी शिक्षणात खूप तरबेज आहे आणि तिला वैज्ञानिक व्हायचे आहे. खूप थोड्या लोकांना माहिती आहे की, शुभांगीला इतकी मोठी मुलगी आहे.
एका मुलाखतीत तिने सांगितले की, तिचे पती एका जाहिरात एजन्सीमध्ये काम करायचे. अभिनेत्री म्हणाली, “मी त्यांच्या कंपनीत एक अॅड फिल्म शूट केली होती. मग माझ्या फोटोग्राफरने मला चित्रपटांमध्ये हात आजमवण्यास सांगितले. माझ्या मुलीच्या जन्मानंतर मी अभिनय करण्यास सुरवात केली.” २००७ मध्ये शुभांगीला पहिला शो ‘कसौटी जिंदगी की’ मिळाला.
यानंतर शुभांगीने ‘कसौटी’, ‘करम अपना अपना’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘चिडीयाघर’, आणि ‘गुलमोहर गार्डन’ सारख्या मालिकेत काम केले. २०१६ मध्ये वादामुळे शिल्पा शिंदेने ‘भाभीजी’ची भूमिका सोडल्यानंतर, शुभांगीला ती संधी मिळाली, ज्यामुळे ती खूप प्रसिद्ध झाली.
इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या तिच्या फोटोंवरून हे सिद्ध होते की, ती खऱ्या आयुष्यात खूपच बोल्ड आणि स्टाईलिश आहे. शुभांगी अत्रेला बहुतेक चाहते टीव्ही मालिका ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेतील ‘अंगुरी भाभी’ च्या नावाने ओळखतात. या शोमध्ये शुभांगीने शिल्पा शिंदेची जागा घेतली. सुरुवातीला तिला या भूमिकेसाठी ट्रोल केले गेले, मात्र कालांतराने ती या भूमिकेत पूर्णपणे मिसळली आणि तिने स्वत: ला सिद्ध केले.