Saturday, June 29, 2024

मामा-भाच्याचे नातं इतकं कसं बिघडलं? जाणून घ्या कृष्णा अभिषेक आणि गोविंदामधील वादाच कारण

कृष्णा अभिषेक ‘द कपिल शर्मा शो’च्या नुकत्याच झालेल्या भागात उपस्थित राहिला नाही. कारण त्याचे मामा गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा हे दोघे शो मध्ये पाहुणे म्हणून उपस्थित होते. गेल्या काही वर्षांत, कृष्णा आणि गोविंदा यांच्यातील संबंध इतके बिघडले आहेत की, दोघेही एकमेकांसमोर येण्यासाठी टाळाटाळ करतात. तोंड देण्यास लाजतात. परिस्थिती चांगली व्हावी, तसेच दोघांमधील वाद कमी व्हावेत, म्हणून कृष्णा अभिषेक सतत देवाकडे प्रार्थना करतो. पण अजूनही वाद कमी होण्याच्या मार्गावर दिसत नाही. अनेक प्रेक्षकांच्या मनात प्रश्न आहे की, मामा-भाच्याचे नाते इतके कसे बिघडले? चला तर मग आज यांच्यातल्या वादाचे कारण जाणून घेऊ.

एकदा ज्या शोमध्ये कृष्णा काम करायचा त्याच शोमध्ये गोविंदा पाहुणा म्हणून आला होता. तेव्हा कृष्णाची पत्नी अभिनेत्री कश्मिरा शाहने ट्वीट केले की, ‘काही लोक असे आहेत, जे पैशासाठी डान्स करतात.’ गोविंदाची पत्नी सुनीताने कश्मिराच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला. तिला वाटले की, हे बोलणे तिच्या पतीसाठी बोलले गेले आहे. मामा- मामी नाराज झाल्याने कृष्णाने स्वत: या कृत्याबद्दल माफीही मागितली होती. मात्र, कश्मिराने तिची चूक मान्य केली नाही.

माध्यमातील वृत्तानुसार, जेव्हा गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता कृष्णाच्या जुळ्या मुलांच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेल्या पार्टीला उपस्थित राहिले नाहीत, तेव्हा हा वाद आणखी पेटला. त्यानंतर सुनीता म्हणाली होती की, “तिला वाढदिवसाच्या पार्टीसाठी आमंत्रण दिले नव्हते.” परंतु दुसरीकडे कृष्णाने हा आरोप नाकारला होता. कृष्णा म्हणाला की, “त्याने मामाला फोन करुन आमंत्रण दिले होते. मात्र, त्यांना वाढदिवसाला उपस्थित राहण्याची गरज वाटत नव्हती, म्हणून त्यानी लंडनला फिरायला जायचे ठरवले.”

कृष्णा म्हणाला की, “जेव्हा माझा मुलगा रुग्णालयात होता, तेव्हा त्याचे मामा त्याला भेटायला रुग्णालयात आले नव्हते.” मात्र, गोविंदाने सांगितले की, “ते त्याच्या मुलाला भेटण्यासाठी रुग्णालयात गेले होते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जेव्हा गोविंदा ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पाहुणा म्हणून सामील झाला होता, तेव्हा कृष्णा अभिषेक शोमध्ये उपस्थित राहीला नव्हता. यामुळे मामा-भाच्यामधील भांडण जगजाहिर झाले.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिनेत्री सुरभी चंदना आहे तब्बल ‘इतक्या’ मिलियन डॉलर्स संपत्तीची मालकीण; एका वर्षात कमवते १ कोटी

-रजनीकांत यांची ऑनस्क्रीन पत्नी बनून चर्चेत आली होती श्रिया सरन; शॉर्ट ड्रेसमुळे मागावी लागली माफी

-काळजाचा ठोका चुकवणारी बातमी! चिरंजीवीचा भाचा अन् अभिनेता साई धरम तेजचा अपघात; आता कशीय तब्येत?

हे देखील वाचा