टीव्हीचा लोकप्रिय सिंगिंग रियॅलिटी शो ‘इंडियन आयडल १२’ त्याच्या शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहचणार आहे. लवकरच या सीझनच्या विजेत्याचे नावही समोर येईल. हा शो सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. कधी स्पर्धकांच्या शानदार गायनामुळे, तर कधी वादांमुळे या सीझनने बऱ्याच चर्चा रंगवल्या आहेत. तसेच येत्या १५ ऑगस्टला म्हणजेच स्वातंत्र्यदिनी ‘इंडियन आयडल १२’चा फिनाले असणार आहे. मात्र या वेळेचा फिनाले इतर सीझनपेक्षा वेगळा असणार आहे. दरम्यान, एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात गायक जावेद अली फिनालेमध्ये काय होणार आहे याबद्दल बोलताना दिसत आहे.
सोनी टीव्हीच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक जावेद अली फिनालेबद्दल बोलताना खूप उत्साही दिसत आहे. शिवाय तो जबरदस्त सराव करतानाही दिसत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकू शकता की जावेद म्हणतो, “इंडियन आयडलचा फिनाले खूप ग्रॅंड असणार आहे. रियॅलिटी शोच्या इतिहासात असा फिनाले कधीच झाला नव्हता. मला खूप आनंद आहे, की मी देखील या ग्रँड फिनालेमध्ये परफॉर्म करणार आहे. मी दानिशसोबत एक परफॉर्मन्स करत आहे आणि मी फौजी बंधूंसाठी देखील एक सोलो परफॉर्मन्स करत आहे. दोघांमध्ये ताळमेळ खूप चांगला झाला आहे, आम्ही दोघे खूप एन्जॉय करत आहोत. जोपर्यंत आपण स्वतः संगीताचा आनंद घेत नाही, तोपर्यंत आपण इतरांना त्याचा आनंद घेऊ शकत नाही. १२ तासांत संगीताचा जोरदार पाऊस पडेल. (tv indian idol 12 finale singer javed ali reveals the interesting facts about singing reality show grand finale)
‘इंडियन आयडल १२’च्या फिनालेमध्ये टॉप ६ स्पर्धक पोहोचले आहेत. ज्यात पवनदीप राजन, अरुणिता कांजीलाल, सायली कांबळे, शण्मुखप्रिया, निहाल तारो, मोहम्मद दानिश यांचा समावेश आहे. फिनालेबद्दल बोलायचे झाले, तर यावेळी हे १२ तास चालेल. आतापर्यंतचा हा सर्वात मोठा फिनाले, स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ ते रात्री १२ प्रसारित केला जाईल. केवळ स्पर्धकच नाही, तर प्रेक्षकही फिनालेबद्दल खूप उत्सुक आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-रूबीना दिलैकच्या नवीन गाण्याला भरभरून प्रतिसाद; अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत मानले चाहत्यांचे आभार
-आनंदाची बातमी! अभिनेत्री नयनताराने केली साखरपुड्याची पुष्टी; जाणून घ्या कोण आहे तो नशीबवान?
-सोनू अभिनेत्रीसोबत करत होता ‘तुम तो ठहरे परदेसी’ गाण्यावर डान्स; मध्येच आला चाहता आणि…