प्रेक्षकांना खळखळून हसवणारा ‘द कपिल शर्मा’ घेतोय आपला निरोप, पाहा काय आहे कारण


टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधला सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध झालेला शो म्हणजे ‘द कपिल शर्मा शो’. प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माचा असलेला हा शो म्हणजे देशातीलच नव्हे विदेशातील प्रेक्षकांच्या टेन्शनचे रामबाण औषध आहे. ह्या शोने प्रचंड लोकप्रियता मिळवली. आठवड्याचा संपूर्ण शीण केवळ १ तासात काढणारा हा शो काही मीडिया रिपोर्टनुसार लवकरच बंद होत आहे.

सगळ्याच क्षेत्रातील सेलीब्रेटी लावतात हजेरी

आतापर्यंत बॉलिवूड, टेलिव्हिजन, राजकारण, खेळ, मीडिया आदी जवळपास सर्वच क्षेत्रातून या कार्यक्रमात अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे. कपिल शर्मा आणि त्याची संपूर्णं टीम आलेल्या पाहुण्या कलाकारांचे आणि सोबतच संपूर्ण प्रेक्षकांचे धमाकेदार मनोरंजन करते. अमिताभ बच्चन, सलमान खान पासून ते अगदी मोना सिंगपर्यंत आणि कपिल देवपासून वसीम अक्रमपर्यंत अनेक सेलिब्रिटी या शोमध्ये येऊन गेले आहेत. मात्र सध्या बाहेर येत असलेल्या माहिती नुसार हा शो लवकरच बंद होणार आहे. पण याबाबत अजून निर्मात्यांकडून कोणतेही अधिकृत स्टेटमेंट आले नाहीये.

‘द कपिल शर्मा शो’चा चालू असलेला सिझन बंद होणार असला तरी नवीन सिझन लवकरच सुरु होणार असल्याचे बोलले जात आहे. हा शो खूप यशस्वी आणि प्रेक्षकांची मागणी असणारा असल्यामुळे चालू सिझन बंद होताच लवकरच नवीन सिझन येणार आहे. तोपर्यंत प्रेक्षकांना नवीन भागांची वाट पाहावी लागेल. लॉकडाऊनमुळे या शोमध्ये लाईव्ह प्रेक्षक येत नाहीये. तरीदेखील या शोच्या लोकप्रियतेमध्ये कोणतीच घट झाली नाही.

या कलाकारांनी गाजवला कपिलचा शो

या कार्यक्रमात कपिल शर्मासोबतच भारती सिंह, कीकू शारदा, कृष्णा अभिषेक आणि अर्चना पूरण सिंह आदी कलाकार दिसतात.

कपिल शर्मा दिसणार वेबसिरीजमध्ये

कपिल शर्मा लवकरच डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण करू शकतो. प्राप्त माहितीनुसार कपिल येणाऱ्या काही काळात एका वेबसिरीजमध्ये दिसणार असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वीच कपिलने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेयर करत तो लवकरच नेटफ्लिक्सवर दिसणार असल्याचे सांगितले होते. कपिलने त्याच्या डिजिटल पदार्पणासाठी २० कोटी रुपये घेतल्याचे कृष्णा अभिषेकने सांगितले. मात्र तो एक विनोद असल्याचे नंतर लगेचच सांगण्यात आले होते.


Leave A Reply

Your email address will not be published.