Sunday, January 18, 2026
Home कॅलेंडर कॉमेडीयन कपिल शर्माला दिलीप छाबड़िया घातला साडे पाच कोटींचा गंडा, कपिलची पोलिसांकडे धाव

कॉमेडीयन कपिल शर्माला दिलीप छाबड़िया घातला साडे पाच कोटींचा गंडा, कपिलची पोलिसांकडे धाव

प्रसिद्ध आणि लोकप्रिय कार डिझायनर दिलीप छाबड़ियाने कॉमेडियन कपिल शर्माला साडे पाच कोटी रुपयांना फसवले. २९ डिसेंबरला डी.सी. डिझाइनचे संस्थापक प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाबड़िया याला अटक केली. दिलीपला कपिलने एक व्हॅनिटी व्हॅन डिझाइन करायला सांगितले होते. त्यासाठी कपिलने सर्व पेमेंट देखील केले होते.

मात्र त्यांना ती व्हॅनिटी व्हॅन अजूनपर्यंत मिळालेली नाही. याच संदर्भात कपिल त्याचा जबाब नोंदवण्यासाठी गेला होता. कपिल शर्माने २०१७ साली दिलीप छाबडियाची कंपनी डी.सी. डिझाइनला एक व्हॅनिटी व्हॅन तयार करण्यासाठी पाच करोड रुपये दिले होते. त्यात २०१८ सालापासून जीएसटी लागू झाल्याने त्याला अजून ६० लाख रुपये त्यांना द्यावे लागले. ते सुद्धा कपिलने दिले. मात्र २०२० संपून देखील कपिलला त्याची व्हॅनिटी व्हॅन मिळाली नाही. सप्टेंबर २०२० मध्ये डी.सी. कंपनीकडून कोणतीही माहिती न मिळाल्याने कपिलने मम पोलिसांच्या इकनोम‍िक ऑफेंस व‍िंग म्हणजेच EOW येथे तक्रार दाखल केली होती. त्यासाठीच कपिल जबाब नोंदवायला पोहचला होता.

जबाब नोंदवल्यावर जेव्हा कपिल बाहेर आला तेव्हा त्याने मीडियासोबत बोलताना सांगितले, ‘मी खूप आनंदी आहे कारण छाबडिया सारख्या लोकांना अटक झाली आहे. आपल्या देशात व्हाईट कॉलर क्राइम खूप वाढत आहे. मी माझा जबाब पोलिसांसमोर नोंदवला असून लवकरच पुढची प्रोसिजर होईल.’

२८ डिसेंबरला डीसी डिजाइनचे संस्थापक प्रसिद्ध कार डिजाइनर दिलीप छाबड़ियाला मुंबई पोलिसांनी अटक केली. छाबडिया कार फायनान्स आणि खोटे रजिस्ट्रेशन रॅकेट मध्ये संबंधित आहे. त्याच्यावर आरोप आहे की तो ग्राहक बनून स्वतःच्या गाड्या विकत घ्यायचा आणि त्यावर कार लोन घ्यायचा. दिलीपने बॉलीवूडच्या अनेक कलाकारांच्या व्हॅनिटी व्हॅन तयार केल्या आहेत.

दिलीप छाबडिया हा काही वर्षांपूर्वी कार मॉडिफिकेशन आणि कॉन्सेप्ट डिजाइनचा मास्टर होता. त्याने जेम्स बॉण्डची एस्टन मॉर्टिन डीबी-८ पासून भारताच्या पहिल्या स्पोर्ट्स कार पर्यंत अनेक गाड्या डिझाइन केल्या आहेत.

हे देखील वाचा