Tuesday, July 9, 2024

रिस्क है तो इश्क हे म्हणत केबीसीतल्या स्पर्धकाने खेळला खेळ! साडे सहा लाखांच्या प्रश्नावर रिस्क पडली भारी…

“कौन बनेगा करोडपती?” हा कार्यक्रम गेली कित्येक वर्षे सुरू आहे आणि परंपरेप्रमाणे प्रत्येक पर्वात बिग बी अमिताभ बच्चन अव्याहतपणे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहेत. सध्या टिव्हीवर केबीसीचं बारावं पर्व सुरू आहे. या बारा पर्वांमध्ये हजारो स्पर्धक आले आणि गेले. कुणी करोडपती होऊन गेले, कुणी लखपती होऊन गेले तर कुणी रिकाम्या हातांनी परतले. काहींना तर हॉटसीट वर देखील बसता आलं नाही. या सर्व स्पर्धकांसोबत बिग बी नेहमीच आदराने आणि प्रेमाने वागतात. तसच स्पर्धकांवर कोणतंही दडपण येऊ नये यासाठी त्यांना हसत खेळत प्रश्न विचारतात.

असाच एक तरुण स्पर्धक केबीसी मध्ये आला आणि हॉटसीटवर विराजमान देखील झाला. पण या गुजराती स्पर्धकाचा जगण्याचा एक फंडा आहे तो म्हणजे रिस्क आहे तर ईश्क आहे. त्याच्या या फंड्याप्रमाणे तो करोडपती होतो की नाही या सोबतच बिग बींनी त्याच्यासाठी काय गंमती केल्या हे पाहणार आहोत.

मंगळवारी २९ डिसेंबर रोजी ‘कौन बनेगा करोडपती पर्व १२’ मध्ये गुजरातमधून आलेला स्पर्धक जुगल भट्ट अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉट सीटवर बसला होता. जुगल भट्ट एक रोलओव्हर स्पर्धक होता, त्याने २८ डिसेंबरच्या पहिल्या भागातील फास्टेस्ट फिंगर फर्स्ट या खेळात सर्वात वेगवान प्रतिसाद देऊन हॉट सीटवर आपलं स्थान मिळवलं होतं. २८ डिसेंबर रोजी त्याने २० हजार रुपये जिंकले होते आणि मंगळवारी ४० हजार रुपयांच्या प्रश्नासह त्याचा खेळ सुरू झाला.

जुगल भट्ट बरोबर खूप मस्ती करत, अमिताभ बच्चन यांनी खेळाला पुढे नेलं. जुगलला रॅप आवडत असल्यामुळे बिग बिंनीही जुगलवर रॅप केला आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी चर्चा केली. तसं पाहायला गेलो तर, बिग बी प्रत्येक स्पर्धकासह असंच करतात जेणेकरून स्पर्धकाला हॉट सीटवर बसून खेळताना कुठलंही दडपण येणार नाही. जुगलने केबीसीतील अनेक प्रश्नांची उत्तरं देताना रिस्क घेतली होती. कारण त्याच्या जगण्याचा फंडाच आहे रिस्क आहे तर ईश्क आहे. हा संवाद आपण सोनी लिव्हच्याच स्कॅम १९९२: द हर्षद मेहता स्टोरी या वेबसिरीज मध्ये ऐकलाच असेल.

जुगलच्या समोर काही प्रश्न असे आले होते, ज्यांची उत्तरं त्याला ठाऊक नव्हती, परंतु त्याने रिस्क घेतली आणि तुक्का मारला, योगायोगाने उत्तर बरोबर होतं. पण जेव्हा ६ लाख ४० हजारांच्या रकमेचा अकरावा प्रश्न विचारला गेला तेव्हा मात्र जुगलचं उत्तर चुकलं आणि त्याला ६ लाख ४० हजार रुपये जिंकता आले नाहीत आणि फक्त ३ लाख २० हजार रुपये घेऊनच तो घरी परतला. पण आपल्याला काय वाटतं आपण असता त्याच्या जागी असता तर देऊ शकला असता का त्या प्रश्नाचं उत्तर? जर हो तर मग हा आहे जुगलला विचारला गेलेला प्रश्न आपल्यासाठी :-

इनमें से किस प्राचीन सिंधु घाटी सभ्यता के स्थल को स्थापित तौर पर कोटाडा टिम्बा के नाम से जाना जाता है, जिसका अर्थ ‘बड़ा किला’ होता है?

A- बनावली

B- धोलावीरा

C- लोथल

D- राखीगढ़ी

जुगल ने लोथल हे उत्तर दिलं जे चुकीचं उत्तर होतं. मग बरोबर उत्तर काय होतं. बरोबर उत्तर होतं ‘धोलावीरा’!

हे देखील वाचा