Saturday, August 2, 2025
Home कॅलेंडर अरर्रर्रर्र! उत्तर अगदी सोप्पं होतं, पण येत नसल्याने सोडावे लागले तब्बल ‘इतक्या’ लाखांवर पाणी

अरर्रर्रर्र! उत्तर अगदी सोप्पं होतं, पण येत नसल्याने सोडावे लागले तब्बल ‘इतक्या’ लाखांवर पाणी

सोनी टीव्हीचा बहुचर्चित आणि लोकप्रिय प्रश्नमंजुषा कार्यक्रम म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती?’. अमिताभ बच्चन यांच्या खुमासदार सूत्रसंचलनामुळे हा शो खूप लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाच्या ३० डिसेंबरच्या भागात २९ डिसेंबरची रोल ओव्हर स्पर्धक होती, नागपूरची नेहा राठी. नेहाने ३० डिसेंबरच्या भागाच्या पहिल्याच प्रश्नाला हा शो सोडला.

११ प्रश्नांची बरोबर उत्तरे देऊन नेहाने सहा लाख चाळीस हजार इतकी मोठी रक्कम जिंकली. नेहाला अमिताभ यांनी बारा लाख पन्नास हजार रुपयांसाठी गणितासंबंधी प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाचे उत्तर नेहाला न आल्याने तिने हा गेम थांबवला. नेहाला ३० डिसेंबरच्या भागात विचारण्यात आलेला प्रश्न होता,
१४ मार्चला यापैकी कोणता दिवस साजरा केला जातो?
पर्याय होते-  १) मोल दिवस २) पाई दिवस ३) पाइथागोरस प्रमेय दिवस ४) फिबोनाची दिवस
याचे बरोबर उत्तर होते, पर्याय २. पाई दिवस

नेहाला योग्य उत्तर माहित नसल्याने आणि तिच्या सर्व लाईफ लाईन संपल्याने तिने गेम सोडला.

तत्पूर्वी नेहाने सांगितले की, तिचे लवकरच लग्न होणार आहे. १२ मध्ये असल्यापासून ती एका मुलाला डेट करते, १० वर्षाच्या लॉन्ग रिलेशनशिप नंतर तिचे आता लग्न होणार आहे. सुरुवातीला दोघांच्याही घरचे या नात्याच्या विरोधात होते, मात्र खूप समजवल्यानंतर ते तयार झाले, आणि त्यांचे लग्न होणार आहे. यावर अमिताभ यांनी तिला खूप शुभेच्छा देखील दिल्या.

हे देखील वाचा