सोनी टीव्हीच्या कौन बनेगा करोडपती 14 चा आगामी भाग खूप खास असणार आहे. 11 ऑक्टोबर रोजी केबीसीच्या सेटवर बिग बींचा वाढदिवस साजरा होणार आहे. ‘कौन बनेगा करोडपती’च्या 14 अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) यांना एक सरप्राइज मिळाला. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये बिग बींना प्रश्न विचारले जाणार आहेत. कारण या शोमध्ये बिग बींची पत्नी जया बच्चन (Jaya Bachchan) आणि मुलगा अभिषेक बच्चन(Abhishek Bachchan) यांनी एण्ट्री केली आहे. या नव्या एपिसोडचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये जया आणि अभिषेक मिळून बिग बींना मजेशीर प्रश्न विचारताना दिसतात.
या एपिसोडमध्ये जया बच्चन यांनी बिग बींना असा प्रश्न विचारला, की ते काहीचं बोलू नही शकले. या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी त्यांच्याकडे कोणता पर्यायसुद्धा नव्हता. पुढे जया बच्चन एक प्रश्न विचारतात की, “आपण दोघं जर एखाद्या आयलँडवर अडकलो, तर तुम्ही कोणत्या 3 गोष्टींची निवड कराल”, असा प्रश्न जया बच्चन विचारतात. त्यावर अमिताभ बच्चन त्यांना पर्याय कोणकोणते आहेत असे विचारतात. जया बच्चन म्हणतात की, मात्र कोणत्यात पर्यायाशिवाय या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. हे ऐकून बिग बी चांगलेच पेचात पडतात.
View this post on Instagram
जया बच्चन इथेच शांत बसत नाहीत. जेव्हा अभिषेक बच्चन बिग बीच्या खुर्चावर बसतो तेव्हा जया बिग बींकडे बघून म्हणते, “मी पाहिले तर नाही, मात्र ऐकलं आहे की जेव्हा तुम्ही एखाद्याच्या कामाने किंवा स्वभावाने प्रभावित होता, तेव्हा त्यांना फुलं आणि पत्र पाठवता. तसे मला तर तुम्ही कधी कोणती पत्र पाठवली नाही.”
View this post on Instagram
यावर काय उत्तर द्यावं हे बिग बींना सुचत नहव्ते. ते म्हणतात, “हा कार्यक्रम आता सार्वजनिक होतोय आणि ही चुकीची गोष्ट आहे.” अभिषेकसुद्धा या सर्व गोष्टींची मजा घेताना दिसतो. जया बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यासोबतचा हा खास एपिसोड 11 ऑक्टोबर रोजी प्रसारित होणार आहे. यादिवशी बिग बींचा 80 वा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त या खास एपिसोडचे आयोजन करण्यात आले आहेत. केबीसीच्या सेटवर बिग बींचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रश्मिका आणि विजय मालदीवमध्ये एकत्रच? नेटकऱ्यांच्या हाती मोठा पुरावा
‘तिने लक्ष दिलं नसतं तर मी आज जिवंत नसते’; दीपिकाने केला धक्कादायक खुलासा