Tuesday, July 9, 2024

महाभारतातील ‘हा’ प्रश्न ऐकून स्पर्धकाला पडली कोरड, वाचा नक्की काय होता प्रश्न

भारतातला सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध शो म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती?’. ह्या शो लोकप्रियतेचे अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. १५ प्रश्नांची उत्तरं देऊन करोडपती करणाऱ्या या शो ने आतापर्यंत अनेक लोकांच्या स्वप्नांना आर्थिक बळ दिले आहे.

केबीसीच्या सध्याच्या पर्वातील नुकत्याच झालेल्या एका भागात कोलकात्यातील अनुज कुमार महतो हे स्पर्धक म्हणून पोहचले होते. इलेक्ट्रिशियन म्हणून काम करणाऱ्या अनुज यांना फक्त ७७६ रुपये मिळतात. इतक्या कमी पैशात त्यांचे घर चालत नसल्याने त्यांच्या वृद्ध आईला देखील इतक्या म्हातारपणात काम करावे लागत आहे. अतिशय हालाकीच्या परिस्थितीत अनुज आणि त्यांचे कुटुंब जीवन व्यतीत करत आहे. त्यांनी त्यांच्या ज्ञानाच्या जोरावर केबीसीमध्ये येत २५ लाख रुपये जिंकले आहेत.

अनुज हे अतिशय सावध पद्धतीने हा खेळ खेळत होते. मात्र सहावा प्रश्न ऐकताच त्यांच्या घश्याला कोरड पडली. अमिताभ बच्चन यांनी एक व्हिडिओ दाखवत त्यांना विचारलेला सहावा प्रश्न होता, “यापैकी कोणी कुरुक्षेत्राच्या युद्धात कर्णाच्या रथाचे सारथ्य केले होते? मात्र अनुज यांना या प्रश्नाचे उत्तरं येत नव्हते. यावेळी त्यांना घशाला कोरड देखील पडली, म्हणून त्यांनी पाणी प्यायले. पण तरीही त्यांना उत्तर न आल्याने त्यांनी ‘आस्क दि एक्स्पर्ट’ नावाची लाईफलाइन वापरली. एक्सपर्टकडून अनुज यांना याप्रश्नाचे उत्तर ‘शल्य’ असे सांगितले गेले आणि ते उत्तर बरोबर निघाले.

हे देखील वाचा