भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सोमवारी (15 मार्च) रोजी स्पोर्ट्स अँकर संजना गणेशनसोबत लग्नबंधनात अडकला. यावेळी दोघांच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. संजना आणि जसप्रीत बुमराह यांच्या जोडीला चाहत्यांनीही खूप पसंत केले आहे.
या दोघांनीही त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यात हे जोडपे गुरुद्वारात एकमेकांचे हात पकडताना दिसत आहेत. या कॅप्शनमध्ये नवविवाहित जोडीने लिहिले, “प्रेम जर योग्य असेल, तर आपल्याला ते योग्य मार्ग दाखवते. प्रेमामध्ये एकत्र येऊन आम्ही एक नवीन प्रवास सुरु करत आहोत. आज आमच्या जीवनातील सर्वात आनंददायक दिवस आहे. आम्हाला आमच्या लग्नाची बातमी आणि आमचा आनंद तुमच्याबरोबर शेअर करताना खूप आनंद होत आहे.”
अशा परिस्थितीत, संजना गणेशन कोण आहे आणि कशाप्रकारे तिने जसप्रीत बुमराहचे हृदय चोरले, हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. खरं तर, संजना गणेशन ही एक भारतीय मॉडेल आणि स्पोर्ट्स अँकर आहे. टीव्ही सादरकर्ता म्हणून संजना गणेशन स्टार स्पोर्ट्स नेटवर्कसाठी काम करते. मात्र, तिने आपल्या कारकिर्दीची सुरूवात प्रसिद्ध रियालिटी शो ‘स्प्लिट्सविला’ मधून केली.
अलीकडेच, संजना गणेशन आयपीएल 2021 चा लिलाव होस्ट करताना दिसली. संजनाने चॅनेलसाठी प्रीमियर बॅडमिंटन लीग (पीबीएल) आणि ‘दिल से इंडिया’ देखील होस्ट केले होते. या व्यतिरिक्त तिने इतर अनेक खेळ इव्हेंट्स होस्ट केले आहेत. यात बॅडमिंटन आणि फुटबॉल स्पर्धांचाही समावेश आहे.
संजना ही प्रसिद्ध व्यवस्थापन गुरू गणेशन रामास्वामी यांची मुलगी आहे. रामस्वामी हे पुणे येथील ‘अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स’चे संचालक आहेत.
संजनाने पुणे येथील सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून सॉफ्टवेअर इंजिनीअरची पदवी प्राप्त केली आहे. यानंतर तिने मॉडेलिंग सुरू केली आणि फेमिना मिस इंडिया 2013 मध्ये भाग घेतला. या स्पर्धेत, तिने फेमिना ऑफिशियल गॉर्जियसचा मुकुट आपल्या नावावर केला होता. स्प्लिट्सविला सीझन 7 या लोकप्रिय रियॅलिटी शोचाही संजना एक भाग राहिली आहे. हा सीझन सनी लिओनी आणि निखिल चिनपा यांनी होस्ट केला होता. मात्र, दुखापत झाल्यामुळे संजनाला हा शो सोडावा लागला होता.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-बनायचे होते अभिनेता, पण ‘मला संधीच मिळाली नाही’ म्हणत गायकाने केला अपूर्ण स्वप्नाचा खुलासा
-‘आम्ही जवळपास अर्धा तास एकमेकांशी…’, आमिर खानने केला किरणबद्दल असलेल्या आपल्या प्रेमाचा खुलासा