Wednesday, June 26, 2024

शोएब इब्राहिम पत्नी अन् चिमुरड्याला घेऊन रुग्णालयातून आला बाहेर, फोटो व्हायरल

टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय जोडपे शोएब इब्राहिम आणि दीपिका कक्करच्या घरी चिमुकल्या बाळाचे अगमन झाले आहे. दीपिका ककरने 21 जून रोजी मुलाला जन्म दिला. या बातमीने तिचे चाहते खूप आनंदी झाले. पण यावेळी शोएब इब्राहिमने सांगितले होते की, मुलाची प्रकृती पाहता त्याला एनआयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यामुळे दीपिकाचे चाहते नाराज झाले होते. तिच्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

8 जुलै रोजी रात्री 11च्या सुमारास शोएब इब्राहिमने इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. त्याने सांगितले की, “त्याची पत्नी आणि मुलाल रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.” शोएब इब्राहिम आणि दीपिका कक्कर (Deepika Kakkar) हॉस्पिटलमधून चाहत्यांना सतत अपडेट देत होते. प्रसूती झाल्यापासून आतापर्यंत घडलेल्या सर्व गोष्टी त्यांनी सांगितल्या. पण मुलाला डॉक्टरांनी एनआयसीयूमध्ये ठेवले होते.

शोएब इब्राहिमने पोस्ट करताना लिहिले की, ‘अलहमदुलिल्लाह आज एनआयसीयूमधून शिफ्ट करण्यात आले आहे. अलहमदुलिल्लाह आम्ही लवकरच घरी जात आहोत. आमच्या मुलाची दिवसेंदिवस प्रकृत्ती चांगली होत आहे. तुम्ही सर्वांनी त्याच्यासाठी देवाकडे प्रार्थना केला त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. अशी साथ आयुष्यभर राहूद्या.’

त्याचवेळी, मुलाच्या जन्मानंतर 19 दिवसांनी या दाम्पत्याला अखेर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. हॉस्पिटलमधून बाहेर पडताना शोएब दीपिकाला मिठी मारताना दिसला. मुलाच्या डिस्चार्जचा आनंद दाम्पत्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. यादरम्यान दीपिका आणि शोएबने आपल्या नवजात मुलाला हातात घेऊन कॅमेरासमोर पोज दिली. त्याचबरोबर दीपिकाच्या मुलाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याने चाहतेही खूप आनंदी आहेत.

शोएब इब्राहिमने 28 जूनला सांगितले होते की, डॉक्टरांनी दीपिकाला घरी जाण्याची परवानगी दिली आहे. पण घरापासून रुग्णालय इतके दूर आहे की, अभिनेत्री मुलाला खायला घालण्यासाठी पुन्हा पुन्हा येऊ शकत नाही. त्यामुळे ती अजूनही रुग्णालयातच राहणार आहे. त्यानंतर अभिनेत्री दीपिका सारखी ये-जा करताना दिसली. (TV most popular couple Shoaib Ibrahim and Deepika Kakkar’s son has been discharged from the hospital)

अधिक वाचा-
माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेनेसोबत घडला होता भन्नाट किस्सा, अभिनेत्री म्हणाली, ‘माझा नवरा…’
“अपमान, सर्व प्रकारचा छळ आणि…” सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडची ‘ती’ पोस्ट झाली व्हायरल

हे देखील वाचा