Thursday, September 28, 2023

माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेनेसोबत घडला होता भन्नाट किस्सा, अभिनेत्री म्हणाली, ‘माझा नवरा…’

बाॅलिवूडची ‘धकधक गर्ल’ म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितला ओळखले जाते. तिने तिच्या अभिनयाच्या आणि सौदर्याच्या जोरावर खूप प्रसिद्ध मिळवली आहे. माधुरीच्या डान्सची अदासुद्धा काही वेगळीच असते. तिने तिच्या ठुमक्यांनी 90च्या दशकातील प्रत्येक अभिनेत्याला नाचायला भाग पाडले होते. हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये माधुरी दीक्षितच्या नावाचा पहिल्यांदा समावेश केला जातो.

माधुरी (Madhuri Dixit) सोशल मीडियावर बऱ्यापेकी सक्रिय असते. माधुरी तिचे आणि त्याच्या मुलांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर सतत शेअर करत असते. तिचे लाखो चाहते आहेत. चाहते माधुरीच्या पोस्टचे तोंडभरून कौतूक करताना दिसतात. माधुरी अनेकदा तिच्या नवऱ्यासोबतच्या गोष्टी चाहत्यासोबत शेअर करताना दिसते. बॉलिवूड कलाकारांबद्दलचे अनेक किस्से आपल्याला नेहमीच ऐकाययला मिळत असतात. नुकताच माधुरीने एक किस्सा माध्यमांशी बोलताना सांगितला आहे.

माधुरी म्हणाली की, “चित्ररट सृष्टीत काम करत असताना अनेकदा रोमॅंटिक सीम करावे लागतात. त्यात सतत एक सीन दाखवला जातो. एक मुलगी मुलगी पायात पैजण घालते. त्या पैंजणाचा आवाज करुन मुलासमोरुन ती ये-जा करत असते. त्या आवाजाने मुलगा त्या मुलीला शोधू लागतो. पण ती मुलगी तिथून पळूण जाते. असेच एकदा मी केले होते.”

माधुरी पुढे बोलताना सांगते की, श्रीराम नेने कम्प्यूटरवर काहीतरी काम करत होते. तेव्हा मी पैजण घातले आणि मुद्दाम त्यांच्याबाजूने काहीना काही काम करण्याच्या बहाण्याने चकरा मारू लागले. त्यावेळी ते मला खूप मोठ्याने ओलडले. ते म्हणाले की, आवाज पहिला बंद कर. त्याचा मला त्रास होतोय. माझ्या कामावर माझ मन लागत नाही. असे बोलून त्यांनी माझ्या रोमँटिक मूडची चांगलीच फजिती केली होती. माधुरीने सांगितलेला हा किस्सा ऐकूण सगळेच हसायला लागल्याचे पाहायला मिळात आहे.

अधिक वाचा- 
“अपमान, सर्व प्रकारचा छळ आणि…” सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडची ‘ती’ पोस्ट झाली व्हायरल
“हाय गरमी!”; मौनी रॉयच्या बोल्डनेसने वाढवलं तापमान

हे देखील वाचा