Friday, July 12, 2024

भारती सिंग-हर्ष लिंबाचिया यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ, एनसीबीकडून 200 पानांचं आरोपपत्र दाखल

कॉमेडियन भारती सिंग(Bharti Singh) आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया(Harsh Limbachiyaa) यांच्याविरुद्ध एनसीबीने आरोपपत्र दाखल केले आहे. हे आरोपपत्र ड्रग्ज प्रकरणी करण्यात आले आहे. या दोघांविरुद्ध न्यायालयात 200 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. 2020 मध्ये दोघांना एनसीबीने अटक केली होती. दोघेही जामिनावर बाहेर असले तरी. जून 2020 मध्ये सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये ड्रग्जच्या सेवनाची प्रकरणे समोर आली होती. एनसीबीने तपास सुरू केला तेव्हा अनेक मोठे कलाकार अडचणीत आले होते.

एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खानसह अनेक मोठ्या कलाकाराची चौकशी केली होती. 21 नोव्हेंबर 2020 रोजी एनसीबीने भारती आणि हर्ष यांच्या अंधेरीतील प्रोडक्शन ऑफिसमध्ये छापेमारी केली होती. या छापेमारीत 86.5% ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला होता. हर्ष आणि भारतीने ड्रग्जचे सेवन केल्याची कबुली तपासात दिली होती. या प्रकरणात अटक झाल्यानंतर भारती आणि हर्षची 15 हजार रुपये जामिनावर सुटका करण्यात आली होती. यानंतर एनसीबीने या जोडप्याला अटक केली होती.

एनसीबीने हर्ष लिंबाचिया आणि भारती सिंग यांना न्यायालयात हजर केले आणि त्यानंतर दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, 15 हजार रुपयांची सिक्युरिटी मनी जमा केल्यानंतर जोडप्याला जामीन मिळाला. तेव्हापासून दोघेही बाहेर आहेत. मात्र, फिर्यादीचे म्हणणे न ऐकता जामीन मंजूर करण्यात आल्याचा दावा एनसीबीने न्यायालयात केला होता.

भारती सिंगला अटक करण्यात आली, त्यावेळी ती गर्भवती होती. या एप्रिलमध्ये तिने लक्ष्य या मुलाला जन्म दिला, ज्याला ती प्रेमाने गोला म्हणते. जामिनावर बाहेर आल्यानंतर आणि गरोदरपणातही ती टेलिव्हिजन शो होस्ट करताना दिसली होती. तिला गरोदरपणात काम करण्याबद्दल सांगायचे होते की तिला स्वतःला व्यस्त ठेवायचे आहे आणि कोणत्याही प्रकारच्या तणावाखाली रहायचे नाही.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘असे काही कार्यक्रम आहेत जे अश्लीलता…’ म्हणत, तारक मेहताने कपिल शर्माच्या प्रश्नाला दिले उत्तर

तब्बल 43व्या वर्षी आई होणार अमृता सुभाष, सोशल मीडियावर पोस्ट होतेय व्हायरल…

हे देखील वाचा