Friday, July 5, 2024

ग्लॅमरस लूक नडला! निया शर्माला ‘हाॅटनेस’मुळे गमवावी लागली ‘मणिकर्णिका’ चित्रपटाची मुख्य भुमिका

चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्रींना ग्लॅमरस लूकमुळे त्यांच्या हातचे चित्रपट सोडवे लागले आहेत. टीव्हीची बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणार्‍या निया शर्माने ‘मणिकर्णिका’ चित्रपटाबद्दल मोठा खुलासा केला आहे. निया नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. नियाला तिच्या ग्लॅमरस लूकसाठी ओळखले जाते. २०१६-१७ साली नियाचे नाव टाॅप ५० सेक्सी एशियन महिलांच्या यादी तिसर्‍या आणि दुसर्‍या क्रमांकावर होते. नियाने व्हिडिओ गाणी आणि वेब सीरिजमध्ये काम केले आहे. याशिवाय, ती सतत सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो शेअर करुन निया सोशल मीडियावर आग लावते, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

नियाच्या फोटो आणि व्हिडिओला प्रचंड लाईक्स आणि कमेंट मिळतात. पण तिच्या याच ग्लॅमरस लूकने तिला बाॅलिवूडमध्ये जाण्यापासून रोखले आहे. अलिकडेच, नियाने एका मुलाखतीत सांगितले की, “कंगणा रणौतच्या ‘मणिकर्णिका’साठी माझी निवड करण्यात आली होती. मात्र, त्या भूमिकेत मी खूप हाॅट दिसत होते. त्यामुळे मला ही भूमिका बजावता आली नाही.”

माध्यमातील वृत्तानुसार, जेव्हा नियाला विचारण्यात आले की, तू बाॅलिवूड दिग्दर्शक किंवा निर्मात्याची भेट घेतली आहेस का? नियाने माध्यमांशी बोलताना सांगितले की, “नाही, मी याआधी कधीच कोणत्या बाॅलिवूड दिग्दर्शकांना भेटले नाही. परंतू, मी पहिल्यांदा ‘मणिकर्णिका’साठी दिग्दर्शकांना भेटले होते. त्यात मला मिळालेल्या भूमिकेविषयी मी त्यांच्याशी बोलले. पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. यावेळी दिग्दर्शक मला म्हणाले की, तु खूप हाॅट दिसते. त्यामुळे तू या चित्रपटासाठी परफेक्ट नाहीस. त्यांचे ते बोलणे ऐकुन मी हैराण झाले होते.”

यानंतर निया स्टारकिड्सबद्दल बोलताना म्हणाली की, “मी बाॅलिवूडसाठी तयार नाही, असे सांगण्याचे म्हटले जात आहे. जेव्हा तुम्ही बाॅलिवूड स्टारकिडचा चेहरा बघता, तेव्हा तुम्हाला वाटते की ते तयार आहेत? मला माफ करा. पण मला सांगू नका की, मी तयारआहे की नाही.

नियाच्या कामाविषयी बोलायचे झाले, तर २०१०मध्ये तिने टीव्ही इंडस्ट्रीत पदार्पण केले. तिने २०११ साली स्टार प्लसवरील ‘एक हजारों में मेरी बेहेना है’ या मालिकेत काम केले. त्यानंतर ती ‘जमाई राजा’, ‘खतरों के खिलाडी ८’ आणि ‘नागिन’ यामध्ये दिसली.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-चार वर्षांची असताना दिव्या दत्ताने पाहिले होते ‘हे’ स्वप्न; ‘अशा’प्रकारे ‘शब्बो’ने मारली रुपेरी पडद्यावर एन्ट्री

-विजय देवरकोंडाने वाढदिवसानिमित्त आईला दिली ‘ही’ अनोखी भेट; पाहुन तुम्हीही व्हाल स्तब्ध

-ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार फेस्टिवल धमाका! ऑक्टोबरमध्ये भेटीला येतायेत ‘हे’ चित्रपट अन् वेब सीरिज

हे देखील वाचा