एकीकडे आई कॅन्सरशी लढा देत असताना दुसरीकडे राखी सावंत अडकली ‘या’ प्रकरणात, दाखल झालाय गुन्हा

tv rakhi sawant and her brother accused of cheating fir registered


बिग बॉस 14 ची स्पर्धक आणि डान्सर राखी सावंत मागच्या काही दिवसांत खूप चर्चेत होती. बिग बॉस शोमध्ये येऊन ती काही दिवसातच लोकप्रिय सदस्य बनली. मजेशीर कृत्य करून ती नेहमी प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसली. त्यामुळे तिला ‘एन्टर्टेनर क्वीन’ म्हणून संबोधण्यात आले होते.

सध्या तिची आई कर्करोगावर उपचार घेत आहे. नुकतेच समोर आलेल्या वृत्तानुसार, राखीचे नाव एका फसवणूकीच्या प्रकरणात समोर आले आहे. यामुळे तिची समस्या आणखी वाढली आहे.

दिल्लीच्या विकासपुरी येथे तिच्यावर फसवणूकीच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूकीच्या प्रकरणात आलेल्या नावामुळे राखीचा त्रास वाढू शकतो. राखी आणि तिचा भाऊ राकेश सावंत या दोघांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. राखी सावंत आणि तिचा भाऊ यांच्याशिवाय राज खत्री नावाच्या व्यक्तीचा उल्लेखही एफआयआरमध्ये आहे.

हे प्रकरण 2017 सालचे आहे, असे म्हटले जात आहे. माध्यमाच्या वृत्तानुसार, राखीचा भाऊ राकेश सावंत याने शैलेश श्रीवास्तव नावाच्या एका रीटायर्ड बँक कर्मचाऱ्याची व्यवसायाच्या संदर्भात भेट घेतली होती. ही भेट राज खत्री नावाच्या व्यक्तीने करून दिली होती. राकेशने शैलेशसोबत मिळून चित्रपट-निर्मितीची योजना बनविली. ही फिल्म बाबा गुरमीत राम रहीमच्या कहाणीवर आधारित होती. त्यानंतर राकेशने शैलेश श्रीवास्तवला एक शॉर्ट फिल्म प्रोड्यूस करायलाही सांगितले होते.

पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरनुसार, विकासपुरी परिसरात नृत्य संस्था सुरू करण्यासाठी दोघांमध्ये करार झाला होता. राकेश सावंत यांनी वचन दिले की बहीण राखी सावंतला संस्थेत आणू. त्यानंतर राकेश सावंत आणि राज खत्री यांनी शैलेश श्रीवास्तवकडून, राखीच्या नावाखाली 6 लाख रुपये घेतले. शैलेशला 7 लाख रुपयांचा पीडीसी (पोस्ट डेटेड चेक) दिल्याचा राकेश आणि राज यांच्यावर आरोप आहे. जेव्हा शैलेश हा चेक घेऊन बँकेत पोहोचला, तेव्हा त्याच्यावर चुकीची सही होती.

अहवालानुसार, दोघांमधील करारातीलही सही योग्य नव्हती. म्हणून, करार देखील अवैध झाला. शैलेश श्रीवास्तवने राकेश सावंतला फोन केला असता, त्याने फोनही उचलला नाही. यानंतर त्याने पोलिसांकडे एफआयआर दाखल केली. या संदर्भात राखी सावंत किंवा तिच्या भावाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-हॉटनेस ओव्हरलोड! तेलुगु अभिनेत्रीचे स्विमिंग पूलवरील बिकिनीतील फोटोशूट होतंय व्हायरल, पाहा बोल्ड फोटो

-नादच खुळा! ‘तेरी मिट्टी’ गाण्याला आवाज देणाऱ्या बी प्राकचं नवीन गाणं रिलीझ, होतंय जोरदार व्हायरल

-बजरंगी भाईजाच्या मुन्नीने पुन्हा वेधले चाहत्यांचे लक्ष, डान्स व्हिडिओ होतोय व्हायरल!!


Leave A Reply

Your email address will not be published.