Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

रश्मी देसाईच्या हॉट फोटोशूटने घातलाय इंटरनेटवर धुमाकूळ!

टीव्हीची सुप्रसिद्ध अभिनेत्री रश्मी देसाई सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे, ती आपल्या चाहत्यांशी संपर्कात रहाण्यासाठी दररोज मनोरंजक पोस्ट्स शेअर करत असते. त्याचबरोबर रश्मीचे चाहतेदेखील तिच्या पोस्टची प्रतीक्षा करत असतात. अलीकडे अशाच काही कारणांमुळे रश्मी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. रश्मीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर आपले नवे फोटो शेअर केले आहेत, या फोटोंमध्ये रश्मी यलो ड्रेसमध्ये क्यूट स्टाईलमध्ये पोज करताना दिसत आहे. या फोटोंमध्ये रश्मी खूपच सुंदर आणि बोल्ड दिसतेय.

रश्मी देसाईने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती यलो ड्रेस परिधान करताना दिसत आहे. रश्मीचे हे पिवळ्या रंगाचे गाऊन अतिशय विलासी आणि सुंदर आहे. त्याचबरोबर हा पोशाख खूप परिपूर्ण आहे, यात रश्मीची मोहक शैली तिच्या फोटोंना आणखी मनोरंजक बनवत आहे.

 

रश्मी देसाईचे हे फोटोज सुट्टीच्या वेळी काढले गेलेले दिसत आहेत. तिच्या फोटोंमध्ये मोठमोठे खडक आणि सुंदर दऱ्या दिसत आहेत. ज्यामुळे तीच्या फोटोशूटमध्ये चार चांद लागत आहेत.

रश्मि देसाईने या फोटोला काहीही कॅप्शन तर नाही दिलं परंतु #himachal #traveldairy #hulutravel यासारख्या हॅशटॅग्जच्या मार्फत तीचे हे फोटो हिमाचल मधील असल्याची हिंट तर नक्कीच दिली आहे.

रश्मीची ही स्टाईल चाहत्यांना खूप आवडली आहे. यामुळेच तीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

यापूर्वी रश्मी देसाईने तिचे बोल्ड फोटोज शेअर केल्याने ती हेडलाइन्स मध्ये आली होती. तिने तिच्या फोटोशूटचे फोटो शेअर करुन चाहत्यांना आश्चर्यचकित केलं आहे.

हे देखील वाचा