Sunday, June 8, 2025
Home अन्य बोल्ड अँड ब्युटीफुल! रश्मी देसाई तिच्या बोल्डनेसने करतेय सर्वांना घायाळ! तुम्ही पाहिलेत का तिचे ‘हे’ फोटो?

बोल्ड अँड ब्युटीफुल! रश्मी देसाई तिच्या बोल्डनेसने करतेय सर्वांना घायाळ! तुम्ही पाहिलेत का तिचे ‘हे’ फोटो?

अभिनेत्री रश्मी देसाई सोशल मीडियावर तिचे एकामागून एक बोल्ड फोटो शेअर करताना दिसते. गेल्या काही महिन्यांपासून रश्मीचा गेटअप पूर्णपणे बदलला आहे. फॅशनच्या बाबतीत ती वेगाने पुढे जाताना दिसत आहे. तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर धमाल करताना दिसतात. पुन्हा एकदा तिने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

हे सर्व फोटो रश्मी देसाईने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. बोल्डनेससोबत रश्मी बरीच ग्लॅमरसही आहे. तिचा बोल्ड लूक चाहत्यांकडून चांगलाच पसंत केला जात आहे. यातील काही फोटोंमध्ये अभिनेत्री काळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे, तर बाकीच्या फोटोमध्येही ती काळ्या रंगाच्या बोल्ड लाँग ड्रेसमध्ये दिसत आहे. तसेच कमेंट बॉक्समध्ये युजर्स तिच्या कौतुकाचे पूल बांधत आहेत. रश्मीच्या या नवीन गेटअपवर सातत्याने कमेंट करत चाहते तिची प्रशंसा करत आहेत.

वेबसीरिजमध्ये पदार्पणानंतरपासून रश्मी देसाईचा संपूर्ण लूक पूर्णपणे बदलला आहे. फोटोंमध्ये रश्मीचा काळ्या रंगाचा पोशाख तर लक्ष वेधून घेतच आहे, पण त्याशिवाय तिचा साधा मेकअपही सर्वांना घायाळ करत आहे. अभिनेत्रीने ज्याप्रकारे या ड्रेसमध्ये स्वतःला सादर केले आहे, ते पाहून प्रत्येकजण तिचे कौतुक करत आहे.

रश्मी देसाईने २००४ मध्ये ‘ये लम्हे जुदाई के’ या हिंदी चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते, तर २००६ मध्ये तिने रावण या मालिकेद्वारे टीव्हीच्या जगात पदार्पण केले. यानंतर तिने ‘उतरन’, ‘दिल से दिल तक’ अशा मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारून बरीच लोकप्रियता मिळवली.

रश्मीने बऱ्याच रिऍलिटी शोमध्ये देखील भाग घेतला आहे. यामध्ये ‘जरा नचके दिखा’, ‘झलक दिखला जा’, ‘खतरों के खिलाडी’ आणि ‘नच बलिये’ सारख्या शोचा समावेश आहे. २०१९ मध्ये ती ‘बिग बॉस’ या लोकप्रिय शोमध्येही दिसली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सलमान-अक्षयबरोबर काम केलेल्या अभिनेत्रीचे बिकीनवरील फोटो-व्हिडीओ व्हायरल, तुम्हीही टाका एक नजर

-‘मुलींना खूप गरम होते कारण त्या खूप हॉट असतात’, पाहा नक्की काय केलाय ‘या’ अभिनेत्रीने असा दावा

-मातीशी नाळ जोडलेला अभिनेता पंकज त्रिपाठीने सर्वांसमोर केला बिहारचा ‘लौंडा’ डान्स, ‘द कपिल शर्मा शो’मधील व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा