बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठीने त्याच्या कार्याने अभिनयक्षेत्रात एक विशेष स्थान मिळवले आहे. उत्कृष्ट अभिनय करणारा अभिनेता पंकज त्रिपाठी हा प्रत्येक घराघरात एक सुप्रसिद्ध नाव बनला आहे. वेबसीरिज ‘मिर्झापूर’ असो वा ‘लुडो’ चित्रपट असो, पंकजचा अभिनय असा आहे की, प्रेक्षक पडद्यावरुन आपली नजर हटवू शकत नाहीत.
बिहारच्या गोपाळगंज जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या पंकज त्रिपाठीने आपल्या कारकिर्दीची सुरुवात नाट्यगृहातून केली. त्याने बरेच वर्षे थिएटर केले, जिथे तो बिहारचा प्रसिद्ध ‘लौंडा’ डान्स हा करायचा. दरम्यान, पंकज त्रिपाठीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
वास्तविक हा व्हिडिओ कपिल शर्मा शोमधील आहे. या शोमध्ये तो ‘बरेली की बर्फी’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आला होता, तेव्हा कपिल शर्माच्या विनंतीवरून त्याने ‘लौंडा’ डान्स करून प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले होतेे.
शोमध्ये संभाषणादरम्यान कपिल पंकज त्रिपाठीबद्दल म्हणतो, “यांनी बरेच थिएटर केले आहेत. एक विशिष्ट डान्स असतो, जो मी पाच- सहा वर्षांपूर्वी त्यांना करताना पाहिले होते.” यावर पंकज त्रिपाठी म्हणतो, “मी ज्या भागातून आलो आहे, पूर्वांचल. त्याठिकाणी मुले मुलगी बनून नाचतात. त्यामुळे मी देखील ते शिकलो आहे.” त्याच्या या बोलण्यावर कपिल हसत हसत म्हणाला, “म्हणजे आम्ही देखील पूर्वांचलमध्येच येतो.”
यानंतर पंकज त्रिपाठीने कोटवरून एक ओढणी गुंडाळली आणि म्हणाला की, “जगजित सिंगची गझल आहे, बर्याच वर्षांपूर्वी मी थिएटरमध्ये केली होती. मला ते आदरपूर्वक करायला आवडेल.” जगजित सिंग यांची प्रसिद्ध गझल ‘तुम इतना जो मुस्कुरा रहे हो’ यावर पंकज त्रिपाठीने ज्याप्रकारे ‘लौंडा’ डान्स केला, त्याने सर्व प्रेक्षकांची मने जिंकली.
पंकज त्रिपाठीही आपल्या मातीशी जोडलेला एक व्यक्ती आहे. इंडस्ट्रीत येण्यापूर्वी अभिनेता शेतीही करायचा. आज पंकज त्रिपाठी लाखोंची कमाई करत आहे, पण इतका मोठा स्टार झाल्यानंतरही तो अजूनही त्याच्या मातीशी जोडलेला आहे. अभिनेत्याने एकदा सांगितले होते, एक वेळ असा होता की जेव्हा ६०० रुपयांसाठी तो संपूर्ण रात्र शेतात घालवत असे. कारण ६०० रुपये शेतकर्यासाठी खूप जास्त आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-खेसारी लाल यादवच्या ‘पड़ोसन शोषण करती है’ गाण्याचा यूट्यूबवर राडा! पार केला २८ लाख व्ह्यूजचा टप्पा
-बोल्डनेससाठी चर्चेत राहणारी अभिनेत्री लागली ढसा ढसा रडू, पाहा तिचा व्हायरल व्हिडिओ
-शाहिद कपूरची पत्नी मीरा बनली छोटी मुलगी, आजकालच्या पोरा-पोरींना व्हिडीओतून दिलाय ‘हा’ संदेश