Monday, July 1, 2024

रियॅलिटी शो होस्ट करण्यासाठी तगडे मानधन घेतात ‘हे’ कलाकार; सलमानची फी वाचून घालाल तोंडात बोटे

आपण सगळे टीव्हीवरील रियॅलिटी शो बघत मोठे झालो आहोत. शोमध्ये आलेला प्रत्येक स्पर्धक आपल्या सर्वांचे मनोरंजन करतात. त्याचप्रमाणे त्या शोचे होस्ट देखील आपले मनोरंजन करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की, होस्टमुळेच हे शो परिपूर्ण वाटतात. हल्ली टीव्हीवर अनेक रियॅलिटी शो दाखवले जात आहेत. शोचे परीक्षक आणि स्पर्धकांव्यतिरिक्त, त्याचे होस्ट देखील खूप प्रसिद्ध आहेत. त्यांच्याबद्दल सर्व काही जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच खूप उत्सुक असतात. याच संदर्भात आज आपण या लेखातून शोच्या होस्टच्या मानधनाबद्दल जाणून घेऊया.

१. भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया
टीव्ही इंडस्ट्रीमध्ये भारती सिंग आणि हर्ष लिबंचिया यांना कसलीच तोड नाही. हर्ष आणि भारतीने आपल्या चाहत्यांना हसवून- हसवून अक्षरशः वेड लावले आहे. या दोघांनी आतापर्यंत अनेक शो होस्ट केले आहेत. भारती सिंग ही शोच्या एका एपिसोडसाठी ६ ते ७ लाख रुपये घेते, तर हर्ष लिंबाचिया एका एपिसोडसाठी ३ ते ४ लाख रुपये घेतो.

२. आदित्य नारायण
आदित्य नारायण इंडियन आयडल होस्ट करण्यासाठी लाखो रुपये मानधन घेतो. आदित्य नारायण यांनी २००९ मध्ये ‘सा रे गा मा पा चॅलेंज’ होस्ट केले होते. आदित्य नारायण गेल्या १५ वर्षांपासून टीव्ही इंडस्ट्रीचा एक भाग आहे.

३. मनीष पॉल
मनीष पॉल हे नाव टीव्हीच्या जगात खूप गाजले आहे. मनीष पॉल २०१२ पासून सतत शो होस्ट करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनीष पॉल प्रत्येक सिझन होस्ट करण्यासाठी १.५ कोटी रुपये मानधन घेतो.

४. सलमान खान
अभिनेता सलमान खान बऱ्याच काळापासून बिग बॉस हा शो होस्ट करत आहे. टीव्हीच्या सर्वोच्च आणि सर्वाधिक मानधन घेणाऱ्या होस्टमध्ये त्याची गणना केली जाते. एका हंगामाचे आयोजन करण्यासाठी सलमानला करोडो रुपये दिले जातात. मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानने ‘बिग बॉस १४’च्या प्रत्येक एपिसोडसाठी २० कोटी रुपये घेतले होते.

५. अमिताभ बच्चन
दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन अनेक दशकांपासून ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो होस्ट करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा अमिताभ बच्चन यांनी हा शो होस्ट करायला सुरुवात केली, तेव्हा त्यांचे मानधन प्रति एपिसोड २५ लाख रुपये होते.

मात्र, वाढत्या लोकप्रियतेमुळे त्यांनी आपल्या मानधनात देखील वाढ केली आहे. ते प्रति एपिसोड ३ ते ५ कोटी रुपये मानधन घेतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘आये… तुझं हसणं हीच माझ्या आयुष्यातील खरी कमाई’, म्हणत सिद्धूकडून आईला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा!

-सोनम कपूरच्या आयुष्यातील ‘गोड बातमी’ खरी की खोटी? अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ

-खुशखबर! ‘बिग बॉस’च्या घरात ‘भाईजान’ची एन्ट्री; स्पर्धकांनी जंगल केले पार, तर उघडणार ‘बिग बॉस’चे द्वार

हे देखील वाचा