मागील अनेक दिवसांपासून ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘बिग बॉस ओटीटी’ हा शो सुपरहिट ठरत आहे. हा वादग्रस्त शो म्हणून प्रसिद्ध आहे. बिग बॉसच्या घरात रोज काही ना काही नवीन घडतच असत. आता ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांच्या नात्याची सर्वत्र चर्चा होत आहे. कधी या दोघांमध्ये भांडण, तर कधी प्रेम दिसतं. आजकाल दोघांमध्ये चांगली केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये थोडे वाद झाले होते, मात्र आता सर्व काही ठीक आहे असे वाटते. राकेश शमिताच्या वाढत्या जवळीक दरम्यान राकेशची पूर्व पत्नी रिद्धी डोगराची प्रतिक्रिया समोर आली आहे.
एका माध्यमांतील वृत्तानुसार रिद्धी डोगरा म्हणाली की, “राकेश खूश असेल तर मलाही आनंद आहे. ही त्याची वैयक्तिक बाब आहे.” रिद्धी पुढे राकेशबद्दल म्हणाली की, “मी त्याला या शोमध्ये एक प्रकारचा स्पर्धक म्हणून पाहत आहे. जर दोनपेक्षा जास्त लोक असतील, तर त्याच्यासाठी गर्दी आहे. त्याचं मत मांडण्यासाठी त्याला ओरडायला कधीच नाही आवडत. तो अशाच लोकांशी बोलतो जे त्याला सोयीस्कर आणि विश्वासू वाटतात. दुसरीकडे, निशांत खरोखर चांगला खेळत आहे आणि तो माझा मित्र देखील आहे. मला माहित आहे की, त्याला या शोचा भाग व्हायचे होते आणि तो खूप चांगले काम करत आहे. तो खूप छान लोकांचे मनोरंजन करत आहे.” (tv riddhi dogra reacts on shamita shetty rakesh bapat relationship)
घरात प्रवेश करण्यापूर्वी दोन दिवस आधी राकेश बापट रिद्धीशी बोलला होता. याबद्दल बोलताना ती म्हणाली की, “जेव्हा राकेशने मला सांगितले की तो शो करत आहे. मला आश्चर्य वाटले, कारण ते तसे लोक नसतात ज्यांना आपण मालिकेत पाहतो. पण प्रेक्षकांना वेगळ्या प्रकारची व्यक्ती पाहायला मिळाली. मला खात्री आहे की प्रेक्षकांना त्याला पाहणे आणि त्याचा आनंद घेणे आवडेल. ” त्याचबरोबर शमिता शेट्टी आणि राकेश बापट हे दोघेही यावेळी टॉप ५ मध्ये पोहोचले आहेत.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘कू’ ऍपवरही कंगना रणौत गाजवतेय वर्चस्व; काही दिवसांतच मिळवले तब्बल ‘इतके’ फॉलोव्हर्स
-‘हा निव्वळ पब्लिसिटी स्टंट’, म्हणत मनोज पाटील आत्महत्या प्रकरणावर साहिल खानने सोडले मौन
-शूटिंग सोडून तुर्कीमध्ये ‘हे’ काम करताना दिसली बॉलिवूडची ‘बार्बी गर्ल’, व्हिडिओ शेअर करत म्हणतेय…