Tuesday, July 9, 2024

बॉलिवूड कलाकारांवर टेलिव्हिजन मालिका पडतायेत भारी, रेटिंग्सच्या यादीत आहे त्यांचाच बोलबाला

टेलिव्हिजनवर नेहमीच काही ना काही नवीन गोष्टी घडत असतात. बॉलिवूडमधील चित्रपट पाहण्यापेक्षा प्रेक्षकांना टेलिव्हिजवरील मालिका पाहायला जास्त आवडतात. तसेच प्रेक्षकांनी मालिका विश्वाकडे वळावे यासाठी नेहमीच काही ना काही प्रयत्न चालू असतात. अशातच अनेक बॉलिवूड कलाकार टेलिव्हिजनवर उतरताना दिसले आहेत. त्यांचा चाहता वर्ग मोठा असल्याने त्यांचा वापर देखील झाला. अनेक रियॅलिटी शोमधून बॉलिवूड कलाकारांनी टेलिव्हिजनवर पदार्पण केले, परंतु या सगळ्यात कौटुंबिक मालिकांनी त्यांचा विषय सोडला नाही आणि आज त्याच मालिका वरचढ दिसत आहेत.

टेलिव्हिजनवरील सर्वात चर्चेत असणारा शो म्हणजे ‘बिग बॉस’. या शोचे होस्टिंग अभिनेता सलमान खान गेल्या १५ वर्षांपासून करत आहे. या वर्षी मात्र या शोचा दर्जा काही प्रमाणात घसरलेला दिसत आहे. सुरुवातीचे काही दिवस हा शो खूप चांगल्या पद्धतीने चालला होता. परंतु हळूहळू प्रेक्षक वर्गाला हा शो बोर वाटायला लागला. त्यांनतर शोमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री इतर काही गोष्टी करून शोचा टीआरपी वाढवण्याचा प्रयत्न चालू आहे. (tv serial anupama getting good rating than big bolywood stars show)

‘बडे अच्छे लगते हो’ आणि ‘द बिग पिक्चर’ यांसारखे शो देखील मागे पडले आहेत. ‘द बिग पिक्चर’ या शोमधून रणवीर सिंगने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. या शोमध्ये अनेक पाहुणे कलाकार हजेरी लावतात, परंतु विचार केला होता त्या प्रमाणात हा शो लोकप्रियता मिळवू शकला नाही. तसेच अमिताभ बच्चन हे होस्ट करत असलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ या शोचे रेटिंग देखील घसरत चालले आहे. या शोला १.१ एवढे रेटिंग मिळाले आहे.

यासोबतच कोरिओग्राफर रेमो डिसुझा याच्या ‘डान्स प्लस ६’ हा शो देखील जास्त चर्चेत नाही. काही दिवसांपूर्वी ‘बडे अच्छे लगते हो’ या लोकप्रिय मालिकेचा दुसरा भाग सुरु झाला आहे. परंतु पहिल्या भागाला जेवढा प्रतिसाद मिळत होता, तेवढा प्रतिसाद हा भागाला मिळत नसल्याने दिसून येत आहे. या मालिकेला ०.५ एवढंच रेटिंग मिळाले आहे.

या सगळ्यात कौटुंबिक मालिका ‘अनुपमा’ने गेले अनेक आठवडे टीआरपीच्या यादीत उच्चांक कायम ठेवला आहे. या मालिकेला सर्वत्र खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेने ४६व्या आठवड्यात रेटिंग्जमध्ये ४.१ एवढी कमाई करत सगळ्यांना मागे टाकले आहे. तसेच ‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेने ३.१ रेटिंगची कमाई करत दुसरे स्थान मिळवले आहे. ‘इमली’ आणि ‘उडारिया’ या मालिकांना २.७ च्या रेटिंगसह तिसरे स्थान मिळाले आहे. गेली अनेक वर्षं प्रेक्षकांचे मनोरंजन करत असलेली ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ ही मालिका २.६ रेटिंगसह चौथ्या क्रमांकावर आहे. तर २.१ च्या रेटिंगसह ‘साथ निभाना साथिया २’ आणि ‘ये हैं चाहते’ या मालिका पाचव्या स्थानावर आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘इंटिमेट सीन करायचा असेल, तर…’, सुपरहिट ‘झिम्मा’ चित्रपटातील किसींग सीनबाबत सायली संजीवचे मोठे वक्तव्य

-मिलिंद गुणाजी यांच्या मुलाचा साखरपुडा थाटात पडला पार, सूनबाई आहेत ‘या’ क्षेत्राशी निगडित

-ऐकलंत का! गायिका योगिता बोराटेंचा ‘प्रेमरंग’ कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

हे देखील वाचा