मनोरंजनसृष्टीत सध्या आनंदाचे वारे वाहत आहेत. एकीकडे शुक्रवारी (१६ जुलै) प्रसिद्ध कलाकार जोडपं राहुल वैद्य आणि दिशा परमारने लग्नाची गाठ बांधली, तर आता दुसरीकडे टीव्हीवरील मालिका ‘साथ निभाना साथिया’मधील अभिनेत्रीच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन झाले आहे. अभिनेत्री लवी सासनने नुकतेच मुलाला जन्म दिला आहे. यापूर्वी तिला एक मुलगा आहे आता ती दुसऱ्यांदा आई झाली आहे.
मुलाच्या जन्मामुळे घरातील वातावरण खूपच आनंदी असून तिचा पती कौशिक कृष्णामूर्तीदेखील खूपच आनंदी आहे. तरीही विशेष म्हणजे लवीने आपल्या वाढदिवशीच मुलाला जन्म दिला आहे. त्यामुळे आता दरवर्षी हे मायलेक आपला वाढदिवस एकत्र साजरा करतील. तिच्यावर सोशल मीडियावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. (TV Serial Saath Nibhana Saathiya Fame Lovey Sasan Gave Birth To Baby Boy On Her Birthday)
लवीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले की, ती खूपच आनंदी आहे. तिच्या जीवनात तीन सर्वात खास लोक आहेत. ते म्हणजे तिचा पती आणि दोन मुलं. ती म्हणाली की, “मुलगी व्हावी अशी माझ्या सासऱ्यांची इच्छा होती. मात्र, नशीबात वेगळेच काहीतरी ठरले होते.”
“माझ्या जन्मदिनी मुलाचा जन्म झाला आहे. अशामध्ये घरात मोठा आनंद साजरा करण्याचे आणखी एक कारण मिळाले आहे,” असेही ती पुढे बोलताना म्हणाली. तिने हेही सांगितले की, तिची नॉर्मल डिलिव्हरी झाली आहे.
मोठा मुलगा रॉयस आता मोठा भाऊ झाला आहे, त्याला या मुलाच्या येण्याने कसे वाटत आहे? असे विचारले असता लवी म्हणाली की, “जेव्हा डिलिव्हरी झाली, तेव्हा आम्ही व्हिडिओ कॉल करून त्याला दाखवले की, हा तुझा छोटा भाऊ आहे. रॉयस थोडा गोंधळला आणि हसत मुलाला पाहत होता.”
लवी म्हणाली, “रॉयस अजून लहान आहे. मात्र, त्याच्या डोळ्यात दिसत आहे की, तो आपल्या छोट्या भावाच्या जन्माने खूपच उत्साही आहे. मुले जिथे आई- वडिलांशिवाय चिंतेत असतात आणि रडतात, तरीही रॉयसबाबत असे होत नाही. तो माझ्याशिवायही आपल्या आजी- आजोबांसोबत शांततेत राहतो. तो आमच्या घरी येण्याची वाट पाहत आहे.”
लवीने १९ फेब्रुवारी, २०२० रोजी आपल्या पहिल्या मुलाला जन्म दिला होता. तिने पहिल्यांदा आई झाल्यावर म्हटले होते की, आम्हाला देवाकडून अनोखी भेट मिळाली आहे. यासोबतच तिने खूपच सुंदर फोटो शेअर केला होता. विशेष म्हणजे, तिने पहिल्या मुलाच्या जन्मावेळी आपल्या प्रेग्नंसीची बातमी सर्वांपासून लपवली होती. तिने कोणालाही सांगितले नव्हते की, ती आई बनणार आहे. यानंतर तिने आपल्या बेबी शॉवरचे फोटो शेअर केले होते.
लवीने आतापर्यंत ‘कितनी मोहब्बते हैं २’ आणि ‘कैसा ये इश्क है… अजब सा रिस्क हैं’ यांसारख्या मालिकेत काम केले आहे. तिला सर्वात चांगली प्रसिद्धी ही ‘साथ निभाना साथिया’ मालिकेतून मिळाली.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-