‘गणपती बाप्पा मोरया!’ लग्नानंतर राहुल वैद्यने मंत्रमुग्ध आवाजात केली गणेशाला प्रार्थना; व्हिडिओ होतोय इंटरनेटवर व्हायरल


मागील अनेक दिवसांपासून बिग बॉस फेम स्पर्धक आणि गायक असलेला राहुल वैद्य याच्या लग्नाच्या चर्चा चालू आहेत. अखेर शुक्रवारी (१६जुलै) राहुल आणि दिशा विवाह बंधनात अडकले आहेत. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ कालपासून सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहेत. लग्नाआधी देखील त्यांनी मेहेंदी फंक्शन हळदी फंक्शन, तसेच संगीताचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. त्यामुळे मागील एक आठवडा सर्वत्र केवळ राहुल आणि दिशाच्या लग्नाची चर्चा चालू होती. अशातच त्यांच्या लग्नानंतरचा एक व्हिडिओ समोर आला आहे. (Rahul vaidya and disha Parmar after marriage video viral on social media)

राहुल आणि दिशाचे लग्न झाल्यानंतरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, राहुल ‘वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ’ हे गणपती मंत्र म्हणताना दिसत आहे. अत्यंत मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजात तो देवाला प्रार्थना करताना दिसत आहे. त्याचा आवाज ऐकून लग्न समारंभात सगळेच खूप खुश झाले आहेत. तसेच शेवटी तो ‘गणपती बाप्पा मोरया’ असे देखील म्हणतो. या व्हिडिओला सोशल मीडियावर खूप पसंती मिळत आहे. सर्वत्र हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

राहुल आणि दिशाची लव्ह स्टोरी २०१८ मध्ये सुरू झाली. त्या दोघांनी सर्वात आधी इंस्टाग्रामवर चॅटिंग केली त्यानंतर ते दोघे खूप चांगले मित्र झाले. बिग बॉसच्या घरात असताना राहुलने सर्वांसमोर तिला प्रपोज केले होते. त्याचा तिने तिथे स्वीकार देखील केला होता. ते दोघे या वर्षाच्या सुरुवातीला फेब्रुवारी महिन्यातच लग्न करणार होते, पण कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे त्यांना तारीख पुढे ढकलावी लागली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-महाकठीण! ‘या’ फोटोतील कपिल शर्माला ओळखलं का? कॉमेडियनने दिलं मजेशीर चॅलेंज

-‘या’ कलाकारांनी दिला होता ‘जेठालाल’च्या पात्रासाठी नकार; राजपाल यादवचाही आहे यादीत समावेश

-भूषण कुमार याच्यावर बलात्काराची केस दाखल; आता टी-सीरिजने वक्तव्य जाहीर करत दिली ‘अशी’ प्रतिक्रिया


Leave A Reply

Your email address will not be published.