Tuesday, June 18, 2024

तुम्हाला माहितीये? दिलीप जोशींच्या आधी ‘या’ कलाकारांना ऑफर झालेली ‘जेठालाल’ची भूमिका, नकार देण्याचं कारण तर बघा

टेलिव्हिजनच्या जगात सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध असणारा शो म्हणजे ‘तारक मेहता का उलटा चश्मा’. या शोने लोकप्रियतेचे आणि प्रसिद्धीचे जे शिखर गाठले आहे, ते इतर कोणत्याही मालिकेच्या नशिबी आले नाही. या मालिकेमध्ये वेगवेगळे विषय अतिशय हलक्या फुलक्या आणि विनोदी पद्धतीने दाखवले जातात. मागील १३ पेक्षा अधिक वर्षांपासून हि मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.

मालिकेसोबतच मालिकेतील कलाकार देखील सर्वांच्या ओळखीचे किंबहुना अगदी घरातील सदस्यच बनले आहे. या मालिकेतील मुख्य पात्र म्हणजे ‘जेठालाल गडा’. नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे संकटात सापडलेला जेठालाल, प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करतो. ( Happy Birthday Dilip Joshi )

तारक मेहता का उलटा चश्मा ही मालिका आणि जेठालाल या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू बनल्या आहेत. जेठालाल हे पात्र अभिनेते दिलीप जोशी साकारत आहे. दिलीप जोशींनी त्यांच्या अभिनयाने या भूमिकेला प्रेक्षकांच्या मनावर आणि डोक्यात कोरून ठेवले आहे. अतिशय प्रभावी अभिनव, उत्तम एक्सप्रेशन, विनोदीबुद्धी आदी अनेक गुणांमुळे त्यांनी त्यांच्या या पात्राला जगभरात लाख मिळवून दिली. मात्र तुम्हाला माहित आहे का की, दिलीप जोशी हे या भूमिकेसाठी निर्मात्यांची पहिली चॉईस नव्हते. हो दिलीप जोशी यांच्या आधी ही भूमिका पाच मोठ्या कलाकरांना ऑफर करण्यात आली होती, मात्र त्यांनी नाकारल्यामुळे ही भूमिका सरतेशेवटी दिलीप जोशींच्या पदरात पडली. या लेखातून जाणून घेऊया त्या पाच कलाकारांची नावे.

योगेश त्रिपाठी :
या मालिकेच्या निर्मात्यांनी सर्वात आधी ही भूमिका अभिनेते योगेश त्रिपाठीला ऑफर केली. मात्र योगेश यांनी ही भूमिका नाकारली होती.

किकू शारदा :
योगेश यांच्यानंतर ही भूमिका किकू यांच्याकडे गेली. मात्र किकूने देखील या भूमिकेला नकार दिला. कपिल शर्मा शोची जान असणाऱ्या किकूला या शोने ओळख मिळवून दिली.

अली असगर :
प्रसिद्ध अभिनेता असणाऱ्या अली असगरला देखील असित मोदींनी ही भूमिका ऑफर केली होती. मात्र अलीने देखील या भूमिकेला नकार दिला.

एहसान कुरेशी :
कॉमेडियन एहसान कुरेशींकडे देखील ही भूमिका गेली होती. मात्र त्यांनी देखील या भूमिकेला नकार दिला.

राजपाल यादव :
बॉलिवूडमधील प्रसिद्ध विनोदी अभिनेते असणाऱ्या राजपाल यादव यांना देखील या भूमिकेसाठी विचारणा झाली होती, मात्र त्यांनी देखील या भूमिकेला नकार दिला.

दिलीप जोशी :
सर्वात शेवटी ही भूमिका दिलीप जोशींकडे गेली, त्यांनी ही भूमिका साकारायला होकार दिला आणि ते जेठालाल बनले. पुढे त्यांनी इतिहास रचला. आज दिलीप जोशी जेठालाल नावानेच ओळखले जातात.

हे देखील वाचा