छोट्या पडद्यावरील अनेक अभिनेत्री रील लाईफसोबतच खऱ्या आयुष्यातही बोल्डनेसचा तडका लावताना दिसतात. या अभिनेत्रींमध्ये ‘ये मेरी लाईफ है’ फेम शमा सिकंदर हिचाही समावेश आहे. शमा सिकंदर आज टीव्ही इंडस्ट्रीतील मोठे नाव बनले आहे. शमा तिच्या अभिनयासोबतच बोल्डनेससाठीही ओळखली जाते. नुकतेच तिने तिचा बॉयफ्रेंड जेम्स मिलेरन याच्यासोबत संसार थाटला. तिच्या लग्नाच्या चर्चा जोरदार रंगल्या. तसेच, लग्नाचे फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशात तिच्या बोल्ड फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या फोटोंमध्ये तिचा बोल्ड अंदाज पाहून चाहतेही प्रेमात पडले आहेत.
शमा सिकंदर (Shama Sikander) ही दिवसेंदिवस तिच्या हॉट फोटोशूटमुळे माध्यमांचे लक्ष वेधत आहे. ती नेहमीच तिचे फोटो शेअर करत असते. अशातच तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती गुलाबी रंगाची मोनोकिनी परिधान करून स्विमिंग पूलमध्ये बसल्याचे दिसत आहे. यादरम्यान तिने तिचे केस मोकळे सोडले आहेत.
View this post on Instagram
दुसरीकडे, फोटोमध्ये ती ज्याप्रकारे पाहत आहे, ते पाहून चाहतेही तिचे दीवाने झाले आहेत. ओल्या केसांमधील शमाच्या लूकला चाहत्यांची जोरदार पसंती मिळत आहे. या फोटोला आतापर्यंत २६ हजारांहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. तसेच, शेकडो कमेंट्सचाही वर्षाव झाला आहे. चाहते कमेंट करून तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत. एकाने कमेंट करत “व्वा! खूप हॉट आणि सेक्सी,” असे लिहिले आहे. दुसऱ्या एकाने कमेंट करत लिहिले की, “खूपच सुंदर दिसत आहेस.” आणखी एकाने लिहिले की, “तुला कुणीच हरवू शकत नाही.”
View this post on Instagram
पावसात भिजतानाचा व्हिडिओ झालेला व्हायरल
खरं तर शमा सिकंदर हिने नुकतेच इंस्टाग्रामवर तिचा एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये तिने पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे. तसेच, ती पावसात डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओत दिसते की, भिजलेली साडी शमाच्या अंगावर एकदम चिकटली आहे. यामुळे ती खूपच हॉट दिसत होती. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला ‘टिप टिप बरसा पानी’ हे गाणे वाजत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रँपवॉक करतोय अर्जुन, पण लक्ष वेधलं प्रेक्षकांमध्ये बसलेल्या मलायकाने, कॅमेऱ्यात कैद झाला क्षण
टॉपलेस फोटोशूट ते दिग्दर्शकासोबतचा वाद, ‘या’ कारणांमुळे वादात सापडली होती ‘बर्थडे गर्ल’ कियारा
ब्रेकींग! ‘या’ प्रसिद्ध गायिकेचे निधन, हृद्य विकाराच्या झटक्याने मध्यरात्री घेतला अखेरचा श्वास