‘बिग बॉस’ हा लोकप्रिय रियॅलिटी कार्यक्रम खूपच चर्चेत असतो. बिग बॉसच्या घरामध्ये स्पर्धकांच्या भांडणापासून ते वादापर्यंत हा कार्यक्रम खूपच चर्चेत असतो. या घरामध्ये असेही जोडपे बनतात, ज्यांचे शोच्या बाहेर पडल्यानंतर प्रेम आणखीच वाढते. आजप आपण अशाच जोडप्याविषयी जाणून घेणार आहोत, जे बिग बॉसच्या घरामध्ये खूप चर्चेत आले होते. ते कपल म्हणजेच ईशान सहगल आणि मायशा अय्यर होय. त्यांचे नाते आजही चर्चेत आहे. हे जोडपे ‘बिग बॉस 15’चे स्पर्धक होते. हे जोडपे फार काळ बिग बॉसच्या घरामध्ये टिकले नाहीत, पण आपल्या नात्यामुळे हे जोडपे चांगलेच चर्चेत आले होते.
‘बिग बॉस 15’ या भागामध्ये मायशा अय्यर (Maysha Ayyar) आणि ईशान सहगल (Ishan Sehgal) ही जोडी खूपच चर्चेत आली होती. हे दोघे बिग बॉसच्या घरामध्ये खूपच जवळ आले होते आणि यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली होती. त्यामुळे यांना ‘मायशान’ असे म्हटले जात होते. हे दोघे बिग बॉसमधून बाहेर आल्यावरही एकत्र राहत होते, त्यामुळे या दोघांच्या लग्नाच्या खूपच चर्चा रंगल्या होत्या. मात्र, त्यांच्या ब्रेकअपच्या बातमीने चाहत्यांचे मन तोडले आहे. होय, हे खरे आहे की, ‘मायशान’ या जोडीचे ब्रेकअप झाले आहे. या जोडीने सोशल मीडियाद्वारे ही बातमी चाहत्यांना दिली.
सलमान खान याने दिला होता सल्ला
बिग बॉसच्या घरामध्ये पहिल्याच आठवड्यात ईशान आणि मायशा यांची जोडी बनली होती आणि यानंतर ते दोघे रिलेशनमध्ये आले होते. बिग बॉसच्या घराघरामध्ये यांच्या नात्याच्या चर्चा आणि त्यांच्यातील जवळीकता वाढतच होती. त्यामुळे बिग बॉसचा होस्ट सलमान खान (Salman Khan) याने स्वत: या जोडीला सल्ला दिला होता. मात्र, ही जोडी बिग बॉसमध्ये फार काळ टिकू शकली नाही.
दोघांचे स्वप्न होते वेगळे
View this post on Instagram
ईशान सहगल आणि मायशा अय्यर यांनी वेगळा होण्याचा निर्णय घेतला, तेव्हा ईशानने आपल्या सोशल मीडियाद्वारे एक पोस्ट शेअर करत त्याने ब्रेकअप का झाला आहे याचे कारण स्पष्ट केले आहे. या पोस्टमध्ये लिहिले की, “आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये काही वेगळे करायचे आहे. या नात्यामध्ये मी खूप काही दिले आहे, घरामध्ये आणि घराच्या बाहेर खूप गोष्टी बदलल्या आहेत. आमच्यामध्ये काही गोष्टी कमी पडत आहेत. मला असे वाटत आहे की, आम्ही दोघे एकमेकांसाठी बनलेले नाहीत, आणि हे नातेही फार काळ टिकले नसते. बरं झालं की, आम्ही दोघं वेगळे झालो आहोत.”
सोबतच आयशानेही सांगितले आहे की, “आमच्यामध्ये काहीच योग्य चालत नव्हतं, त्यामुळे आम्ही ब्रेकअप केले आहे.” त्यांच्या या निर्णयामुळे चाहत्यांना मात्र मोठा धक्का बसला आहे. आता हे दोघेही त्यांच्या ब्रेकअपमुळे माध्यमांमध्ये चर्चेत आहेत.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
साऊथमध्ये बिनसलं! YCP सरकारवर भडकले कलाकार, नागार्जुन यांनी थेट नंदामुरींनाच विचारला प्रश्न
श्रेयाकडे आहेत तब्बल ‘एवढ्या’ चपलांचे जोड; आकडा वाचून तुम्हीही म्हणाल, ‘दुकानच टाकूया की मग’