कलाविश्वात काम करणारे प्रसिद्ध व्यक्ती जेव्हा एखाद्या विषयावर त्यांचे मत व्यक्त करतात, तेव्हा त्याविषयी चांगलीच चर्चा होते. असेच काहीसे वक्तव्य आता ‘दिया और बाती हम‘ फेम अभिनेत्री कनिष्का सोनी हिने केले आहे. तिने केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ माजली आहे. अभिनेत्रीने नुकताच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सांगितले की, तिने स्वत:शीच लग्न केले आहे. अभिनेत्रीने भांगेत सिंदूर आणि गळ्यात मंगळसूत्र परिधान करून तिचा फोटो शेअर केला आहे. यामुळे सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. तिने स्वत:शीच लग्न केल्यामुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले, आता तिने त्याचे उत्तर दिले आहे.
कनिष्का सोनीचे टीकाकारांना सडेतोड प्रत्युत्तर
अभिनेत्री कनिष्का सोनी (Kanishka Soni) हिने स्वत:शी लग्न करणे अनेकांच्या पचनी पडले नाहीये. त्यामुळे तिच्या पोस्टवर तिला जोरदार ट्रोल करण्यास सुरुवात केली. यानंतर अभिनेत्रीनेही आता एक व्हिडिओ शेअर करत टीकाकारांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
View this post on Instagram
कनिष्काने तिच्या व्हिडिओमध्ये म्हटले की, “मी पाहिले की, स्वत:शी लग्न केलेल्या माझ्या पोस्टवर खूपच विचित्र कमेंट्स येत आहेत. मी या लग्नाचा खूप मजबूत निर्णय घेतला आहे. अनेकांनी मला म्हटले की, मी विज्ञानाला दुर्लक्षित केले आहे. ते म्हणत आहेत की, मी आता कोणासोबत सेक्स करणार? विज्ञानाने खूप प्रगती केली आहे. आता महिलांना सेक्स करण्यासाठी कोणत्याही पुरुषाची गरज नाहीये.”
View this post on Instagram
कनिष्का सोनी हिने स्वत:शी लग्न का केले?
कनिष्काने तिच्या व्हिडिओत स्वत:शी लग्न करण्यामागील कारणही सांगितले. ती म्हणाली की, “मी गुजरातमधील रूढीवादी कुटुंबातील आहे. माझंही लग्न करायचं स्वप्न होतं, पण माझ्या आयुष्यात अशी व्यक्ती भेटली नाही, जी त्याच्या शब्दावर ठाम राहील. मला नेहमीच असे समजले आहे की, पुरुष कधीही त्यांच्या म्हणण्यावर टिकून राहत नाहीत. म्हणूनच मला विश्वास आहे की, मी आयुष्यभर पुरुषाशिवाय जगू शकते. जर मी स्वतः कमावत असेल, तर मला कोणाचीही गरज नाही. मी स्वतंत्र आहे. मी माझ्या गरजा आणि स्वप्नं पूर्ण करू शकते.” तिने पुढे असेही म्हटले की, “९० टक्के महिला या लग्नामुळे खुश नाहीयेत. माझा पुरुषांवरून विश्वास पूर्णपणे उडाला आहे.”
कनिष्का हिच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. तिने सिनेमा आणि अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे. त्यात ‘पाथायेराम कोडी’ या सिनेमाचा आणि ‘कुल्फीकुमार बाजेवाला’, ‘दो दिल एक जान’ यांसारख्या मालिकांचा समावेश आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पन्नाशी पार केलेल्या अरबाजची ३० वर्षीय गर्लफ्रेंड आहे खूपच बोल्ड, व्हिडिओचा इंटरनेटवर नुसता धुमाकूळ
लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्रीने दिला जुळ्या मुलांना जन्म, श्रीकृष्ण जन्माष्टमी दिवशीच दिली चाहत्यांना गुड न्यूज
व्हायरल व्हिडिओनंतर करणसिंग ग्रोवर नेटकऱ्यांच्या निशाण्यावर; म्हणाले, ‘तो बायकोच्या जिवावर जगतो…’