‘दिया और बाती हम’ फेम अभिनेत्रीने कमी केले तब्बल १७ किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहतेही हैराण!


टीव्हीवर झळकताना आपण नेहमीच सुंदर दिसायला हवे, असे प्रत्येक अभिनेत्रीला वाटत असते. त्यासाठी ते आपल्या आरोग्याची, तंदुरुस्तीची काळजी घेताना आपल्याला अनेकवेळा दिसतात. काही अभिनेत्री तर अशा होत्या, ज्यांचे वजन मर्यादेपेक्षा अधिक होते. त्यावेळी त्यांनी आपल्या जीवनशैलीत अनेक बदल केले आणि आज त्या पहिल्यापेक्षाही ग्लॅमरस दिसत आहेत. अशीच एक अभिनेत्री म्हणजे टीव्हीवरील ‘दिया और बाती हम’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली ‘कनिका महेश्वरी’ होय. मालिकेतील आपल्या भूमिकेने कनिकाने रसिकांच्या मनात एक वेगळे स्थान बनवत चांगली प्रसिद्धी मिळवली. आज ती एवढी बदललीय की तिला पाहून चाहतेही हैराण झाले आहेत. कदाचित काही चाहत्यांना तिला ओळखताही येणार नाही. तिने आपले तब्बल १७ किलो चांगलेच वजन कमी केले आहे.

कनिकाने ‘तू सूरज मैं सांझ पियाजी’ या मालिकेतही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. यामध्ये तिच्या अभिनयाची चांगली प्रंंशसा करण्यात आली होती. सन २०१२ मध्ये तिचे लग्न उग्योजक अंकुर घईसोबत झाले होते. यानंतर लग्नाच्या ३ वर्षांनंतर म्हणजेच सन २०१५ मध्ये त्यांना पुत्ररत्न झाले होते. यानंतर तिने आपल्या करिअरमधून ब्रेक घेत आपल्या कुटुंबाला वेळ दिला होता.

कनिकाचे असे म्हणणे आहे की, वाढत्या वजनामुळे तिला अनेक टीकांचा सामना करावा लागला होता. ठिकठिकाणी तिला व्यक्तींकडून चिडवण्यात येत होते. तिला मोटी बोलवू लागले होते आणि तिच्या वजनाची थट्टा उडवली जात होती. सोशल मीडियावरही नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाना साधला होता. यानंतर कनिकाने वजन कमी करणे हे एक आव्हानच समजले.

तिचा असा विश्वास आहे की, शारीरिक तंदुरुस्तीपेक्षाही महत्त्वाचं काही असेल, तर ते म्हणजे मानसिक तंदुरुस्ती. जर तुमचा मेंदू स्वस्थ आहे, तरच तुम्ही योग्य राहाल. त्यामुळे तिने मानसिक तंदुरुस्तीवर भर दिला. अनेकांनी चिडवल्यामुळे तिने चिंता करण्याऐवजी हे एक आव्हान असल्याचे ठरवले.

कनिकाने लॉकडाऊनदरम्यान आपत्तीचा संधी म्हणून वापर केला. तिने खूप वर्कआऊट केले आणि आपल्या डायटची पूर्ण काळजी घेतली. तिने मुलांनाही सांभाळले. त्याचबरोबर स्वत:कडेही लक्ष दिले.

अशाप्रकारे तिने पाहता पाहता तब्बल १७ किलो वजन कमी केले. आता तिने ‘क्यूं उत्थे दिल छोड आए’ मधून पुनरागमन केले आहे आणि आपल्या ट्रान्सफॉर्मेशनने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-हॉटनेस ओव्हरलोड! तेलुगु अभिनेत्रीचे स्विमिंग पूलवरील बिकिनीतील फोटोशूट होतंय व्हायरल, पाहा बोल्ड फोटो

-नादच खुळा! ‘तेरी मिट्टी’ गाण्याला आवाज देणाऱ्या बी प्राकचं नवीन गाणं रिलीझ, होतंय जोरदार व्हायरल

-बजरंगी भाईजाच्या मुन्नीने पुन्हा वेधले चाहत्यांचे लक्ष, डान्स व्हिडिओ होतोय व्हायरल!!


Leave A Reply

Your email address will not be published.