Thursday, April 24, 2025
Home टेलिव्हिजन माेठी बातमी! प्रसिद्ध मालिकेच्या सेटवर भीषण आग, सर्वत्र माजली एकच खळबळ

माेठी बातमी! प्रसिद्ध मालिकेच्या सेटवर भीषण आग, सर्वत्र माजली एकच खळबळ

स्टार प्लसच्या लोकप्रिय शो ‘गुम है किसी के प्यार में‘च्या सेटवर शुक्रवारी (दि. 11 मार्च)राेजी दुपारी 4 वाजता आग लागली. मुंबईतील गोरेगावमध्ये या मालिकेचा सेट आहे. यावेळी इतर अनेक मालिकाही जवळपास शूट होत होत्या. आग इतकी भीषण आहे की, ती इतर ठिकाणीही पोहोचत आहे. यावेळी 1 हजारांहून अधिक लोक येथे उपस्थित होते. आगीच्या घटनेत निष्काळजीपणाची बाब समोर येत आहे. आग टाळण्यासाठी सेटवर कोणतीही फायर सेफ्टी नव्हती.

सेटवर लागलेली आग इतकी भीषण होती की, ती शेजारीच बांधलेल्या ‘तेरी मेरी दूरियाँ’ आणि ‘अजुनी’च्या सेटपर्यंत पोहोचली. यावेळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या तात्काळ सेटवर पोहोचल्या आणि आग आटोक्यात आणण्यात आली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्वजण सुरक्षित आहेत.

‘गुम है किसी के प्यार में’च्या सेटवर घडलेल्या या दुर्दैवी घटनेदरम्यान, सर्व क्रू मेंबर्स आणि कलाकारांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. शोच्या प्रोडक्शन हाऊस – कॉकक्रो एंटरटेनमेंट शायका फिल्म्सने देखील एक अधिकृत निवेदन जारी केले आहे. प्रॉडक्शन हाऊसच्या प्रवक्त्याने सांगितले की, “आज दुपारी ‘गुम हैं किसी के प्यार में’च्या सेटवर आग लागली. यादरम्यान आमचे सर्व कर्मचारी, कलाकार, ठेकेदार आणि इतर साइटवरील मजुर सुरक्षित आहेत. आम्ही घटनेचे कारण आणि नुकसानीचे प्रमाण शोधण्यासाठी काम करत आहोत आणि सेटवरील प्रत्येकाचे आरोग्य आणि सुरक्षितता हे आमचे तात्काळ प्राधान्य आहे. तरी देखील, आम्ही आमच्या प्रेक्षकांना मनोरंजन करण्याचे काम सुरू ठेवू. (tv show ghum hai kisikey pyaar meiin fire outbreak at neil bhatt and aishwarya sharmas show set photos goes viral )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अभिनेता आकाश कुंभारचे ‘गडद अंधार’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण

जेव्हा ‘पा’मध्ये अमिताभची आई हाेण्यास सांगितले विद्यााल; अभिनेत्री म्हणाली, ‘तुझ्या डाेक्यात…’

हे देखील वाचा