Friday, March 29, 2024

गुम है किसी के प्यार में: केवळ एक मिनिटाच्या प्रोमोसाठी रेखा यांनी घेतले ‘इतके’ भरमसाठ मानधन

स्टार प्लसवरील ‘गुम है किसी के प्यार में’ ही प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. हा कार्यक्रम दीर्घ काळापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आजकाल ही मालिका बरीच चर्चेत आहे. शिवाय हा शो टीआरपीच्या यादीत पहिल्या ५ मध्येही कायम आहे. या शोमध्ये लवकरच जबरदस्त ट्विस्ट येणार आहेत. तसेच, प्रेक्षकांसाठी एक खास सरप्राइज आहे, ते म्हणजे लवकरच या शोमध्ये बॉलिवूडच्या सदाबहार अभिनेत्री रेखा त्यांच्या सौंदर्याचा आणि अदांचा तडका लावताना दिसणार आहेत. अलीकडेच, या शोचा प्रोमो रिलीझ करण्यात आला होता, ज्यात रेखा यांच्या दिलकश आवाजाने चाहत्यांची मने जिंकली. एक मिनिटाच्या या प्रोमोमध्ये, कथेत येणाऱ्या ट्विस्टकडे देखील लक्ष वेधण्यात आले. पण तुम्हाला माहित आहे का, की रेखा यांनी या एका मिनिटाच्या प्रोमोसाठी किती मानधन घेतले आहे.

इतके भरमसाठ घेतले मानधन
माध्यमातील वृत्तानुसार, या मालिकेचा प्रोमो शूट करण्यासाठी रेखा यांनी सुमारे ५-७ कोटी रुपये घेतले आहेत. रेखा यापूर्वीही अनेक शोमध्ये विशेष पाहुणी म्हणून दिसल्या आहेत. त्या नेहमीच त्यांची स्टाइल आणि अदांसाठी ओळखल्या जातात. त्याचबरोबर रेखा अलीकडेच गायन रियॅलिटी शो ‘इंडियन आयडॉल १२’ मध्ये देखील पाहुणी म्हणून पोहोचल्या होत्या. (tv bollywood actress rekha charged 5 crore rupees fees for promo of tv show ghum hai kisi ke pyar meiin)

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये रेखा खूपच सुंदर दिसत आहेत. स्टारप्लसने प्रोमोसह एक सुंदर कॅप्शन लिहिले की, ‘कर्तव्यासमोर पुन्हा एकदा उभे आहे प्रेम. आता काय ठरवेल कर्तव्य आणि प्रेमाची ही कहाणी.’ रेखा यांच्या लूकबद्दल बोलायचे झाले, तर प्रोमोमध्ये त्या नेहमीप्रमाणे त्यांच्या आयकॉनिक लूकमध्ये दिसल्या. त्यांनी एक कांजीवरम साडी, वेलवेटी लिपस्टिकसह मोठे कानातले आणि भांगेत सिंदूर लावले होते. नेहमीप्रमाणे त्यांचा हा लूकही चाहत्यांना खूप आवडला.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-रूबीना दिलैकच्या नवीन गाण्याला भरभरून प्रतिसाद; अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत मानले चाहत्यांचे आभार

-आनंदाची बातमी! अभिनेत्री नयनताराने केली साखरपुड्याची पुष्टी; जाणून घ्या कोण आहे तो नशीबवान?

-सोनू अभिनेत्रीसोबत करत होता ‘तुम तो ठहरे परदेसी’ गाण्यावर डान्स; मध्येच आला चाहता आणि…

हे देखील वाचा