अरुणिता कांजिलालसोबतच्या आपल्या नात्यावर पवनदीप राजनचा मोठा खुलासा; म्हणाला, ‘आम्ही एकमेकांच्या खूपच…’

टीव्हीवरील प्रसिद्ध सिंगिंग रियॅलिटी शो ‘इंडियन आयडल १२’ हा सर्वांच्या आवडीचा कार्यक्रम आहे. विशेष म्हणजे सुरुवातीपासूनच या मालिकेतील स्पर्धक पवनदीप राजन आणि अरुणिता कांजिलाल यांच्यात निर्मात्यांनी एक वेगळाच रोमँटिक एँगल दिला होता. या लव्ह एँगलबाबत सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी चांगल्याच प्रतिक्रिया व्यक्त करत ट्रोल केले होते. मात्र, शोच्या शेवटपर्यंत या स्पर्धकांना एक जोडी म्हणूनच सर्वांसमोर दाखवण्यात आले. अनेकदा शोचा होस्ट आदित्य नारायण किंवा गीतकार अनु मलिक एपिसोडदरम्यान या दोघांनी चिडवताना दिसले. तसेच ते दोघेही लाजायचे. तरीही आता शो संपण्यापूर्वी पवनदीपने अरुणिताबाबत आपल्या नात्याबाबत मोठा खुलासा केला आहे.

पवनदीपने म्हटले आहे की, अरुणिता त्याची केवळ जवळची मैत्रीण आहे. दोघांमध्ये कोणताही रोमँटिक एँगल नाही. तो म्हणतो की, “खरं सांगायचं झालं, तर आम्ही सर्वांनी एकत्र इतका वेळ घालवला आहे की, आम्ही स्पर्धक एकमेकांच्या खूपच जवळ आहोत.”

View this post on Instagram

A post shared by Pawandeep Rajan (@pawandeeprajan)

त्याला असेही वाटते की, वेळ आल्यावर लोकांना जाणीव होईल की, त्याच्यात आणि अरुणितामध्ये काहीच नव्हते. त्याने म्हटले की, सध्या ते सर्व तरुण आहेत आणि त्यांना आपल्या कारकिर्दीवर लक्ष द्यायचे आहे. प्रेमासारख्या गोष्टी वाट पाहू शकतात. मात्र, पवनदीपची अशी इच्छा आहे की, त्यांची मैत्री तोपर्यंत राहावी, जोपर्यंत ते वृद्ध होत नाहीत. (TV Show Indian Idol 12 Pawandeep Rajan Revealed Shocking Details About His And Arunita Kanjilal Relationship)

‘द वॉयस’चा विजेता राहिला होता पवनदीप
पवनदीप, सन २०१५ मध्ये स्टार प्लसच्या रियॅलिटी शो ‘द वॉयस’चा विजेता राहिला आहे. इडिंयन आयडलचा फायनलिस्ट बनलेला पवनदीपला वाटते की, त्याला आणखी शिकण्यासाठी इंडियन आयडलमध्ये सामील होण्यास प्रवृत्त केले. तो म्हणाला, “इंडियन आयडल हे असे व्यासपीठ आहे, जे कलाकारांना खूप सन्मान देते. ज्याप्रकारे एक्सपोजर इथे तुम्हाला मिळतो, तो अतुलनीय आहे. शोदरम्यान आम्ही सर्वांना खूप गाणे गायला मिळाले. तसेच आमचे मार्दर्शन करण्यासाठी खूप मोठे परीक्षक आणि पाहुणेही व्यासपीठावर होते.”

पार्श्वगायनासाठी तयार आहे पवनदीप राजन
पवनदीप पुढे बोलताना म्हणतो की, रियॅलिटी शोमध्ये परत येण्याचे कारण त्याचे विजयी होणे नाही, तर शिकण्याची इच्छा होती. त्याला पूर्ण विश्वास आहे की, या शोमध्ये इतके महिने घालवल्यानंतर आता तो पार्श्वगायनासाठी तयार आहे.

विशेष म्हणजे, इंडियन आयडल १२ चे विजेतेपदक कोण पटकावते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘महाराष्ट्राचा बहुरंगी, बहुढंगी तमाशा’, सोनाली कुलकर्णीच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

-‘अब क्या कहे क्या नाम ले…’, म्हणत अंकिता लोखंडेने लावले जोरदार ठुमके; डान्स व्हिडिओ व्हायरल

-व्हिडिओ: टायगर श्रॉफने गायलेल्या पहिल्या हिंदी गाण्याचा दमदार टिझर प्रदर्शित

Latest Post