‘खतरों के खिलाडी ११’ शोमध्ये खतरनाक टास्कदरम्यान पुरती घाबरली श्वेता तिवारी; रडून- रडून झाली बेजार


टीव्हीवरील सर्वात प्रसिद्ध आणि चर्चेत असलेला रियॅलिटी शो म्हणजे ‘खतरों के खिलाडी ११’ होय. हा शो सुरू होण्यापूर्वीपासूनच चर्चेत आहे. चाहते आणि दिग्गज स्पर्धकही यासाठी खूपच उत्साहित आहेत. शोची शूटिंग दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये पूर्ण झाली आहे. स्पर्धकांनी शूटिंग पूर्ण करून पुन्हा मुंबईला परतले आहेत. अशामध्ये शोचा नवीन प्रोमो समोर आला आहे. प्रोमो खूपच हैराण करणारा आहे. यामध्ये अभिनेत्री आणि स्पर्धक श्वेता तिवारी जोरजोराने ओरडताना दिसत आहे. (TV Show Khatron Ke Khiladi 11 Promo Shweta Tiwari Cries Before Every Stunt Video Viral)

रडून रडून श्वेता बेजार
श्वेता तिवारीने शोमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला आहे. मात्र, ती खूपच घाबरली आहे, तिला पुरता घाम फुटला आहे. ती प्रत्येक खतरनाक टास्कपूर्वी रडून- रडून बेजार झाली आहे. तसेच ती टास्क करण्यापासून नकार देत आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की, श्वेता आपल्या भीतीचा सामना करू शकणार नाही आणि आधीच माघार घेईल. प्रत्येक टास्कपूर्वी श्वेता रोहित शेट्टीपुढे विनवणी करत आहे. ती म्हणत आहे की, ती खतरनाक टास्क करू शकणार नाही. मात्र, हा प्रोमो पाहून चाहत्यांना हसू फुटले आहे.

श्वेताने चाहत्यांना केले निराश
श्वेताकडून चाहत्यांना खूप अपेक्षा होत्या. तिने टास्कसाठी आपल्या शरीरावर खूप मेहनत घेतली होती. अशामध्ये समोर आलेल्या व्हिडिओने मात्र चाहत्यांना निराश केले आहे. दुसरीकडे युजर्स कमेंट करून म्हणत आहेत की, अभिनव शुक्लाचा प्रोमो दाखवा. चाहते अभिनवला टास्क करताना पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत आणि त्यांना लवकरच त्याचा प्रोमो व्हिडिओ पाहायचा आहे.

मजेशीर असेल शो
रियॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी ११’ लवकरच टीव्हीवर पाहायला मिळणार आहे. शोमध्ये अभिनव शुक्ला, राहुल वैद्य, निक्की तांबोळी, विशाल आदित्य सिंग, वरुण सूद, अर्जुन बिजलानी, दिव्यांका त्रिपाठी, श्वेता तिवारी, आस्था गिल, महक चहल, सना यांसारखे टीव्ही कलाकार स्टंट्स करताना दिसणार आहेत.

असे म्हटले जात आहे की, शो खूपच मजेशीर असणार आहे. मागील काही सिझनप्रमाणे शो रोहित शेट्टी होस्ट करताना दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-समर सिंगच्या नवीन गाण्याचा यूट्यूबवर धुमाकूळ; पाहायला मिळाला नीलम गिरीचा हॉट अंदाज

-आशुतोष पत्कीने शेअर केला जिममधला फोटो; पाहायला मिळाला बबड्याचा ‘फिट ऍंड फाईन’ लूक

-‘मैं तो खड़ी थी आस लगाए…’, रितिका श्रोत्रीच्या निरागसतेने नेटकऱ्यांना पाडली भुरळ


Leave A Reply

Your email address will not be published.