Tuesday, December 24, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘खतरों के खिलाडी’ शोमध्ये जाऊन अभिनेत्रीने केली मोठी चूक, रोहित शेट्टीने रडायलाच पाडलं भाग

जेव्हा एखाद्या मालिकेला प्रेक्षकांचे भरमसाठ प्रेम मिळते, तेव्हा ती मालिका तुफान गाजते. इथपर्यंत की, त्या मालिकेचे पुढचे भाग येऊ लागतात. असेच काहीसे रियॅलिटी शोचेही आहे. प्रसिद्ध रियॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी‘ या रियॅलिटी शोला लोकप्रियता मिळाली आहे. त्यामुळेच या शोचे आज १२ वे पर्व चाहत्यांच्या भेटीला आले आहे. या शोमध्ये टीव्ही कलाकार भाग घेऊन स्टंट करताना दिसतात. तसेच, सर्व टास्क पूर्ण करून विजेते बनतात. मात्र, यादरम्यान त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. असेच एका स्पर्धकासोबत झाले आहे.

चाहत्यांकडून मिळणाऱ्या प्रेमामुळे ‘खतरों के खिलाडी १२’ (Khatron Ke Khiladi 12) हा शो टीआरपीच्या यादीत अव्वलस्थानी कायम आहे. नुकत्याच या शोचा नवीन प्रोमो जारी करण्यात आला. यामध्ये कनिका मान (Kanika Mann) हिच्याकडून सुरांचे राग यासारखा टास्क करवून घेतला. यामध्ये ती एका खतरनाक प्रँकची शिकार झाली. शोचा होस्ट रोहित शेट्टी (Rohit Shetty) याने कनिकाची अशी काही थट्टा केली की, ती रडून रडून बेजार झाली. या टास्कला रोहितने भीतीच्या सुरांचा राग असे नाव दिले आहे.

व्हायरल होत असलेला ‘खतरों के खिलाडी १२’ शोचा प्रोमो खूपच मजेशीर आहे. प्रोमोमध्ये रोहित शेट्टीने स्पर्धकांना विचारले की, त्याच्याकडे स्पर्धकांना विचारले की, त्यांनी भीतीच्या सुरांचे राग ऐकले आहे का? नाही, तर हे आपल्याला कनिका मान ऐकवेल. हे ऐकताच कनिका घाबरते. त्यानंतर टीम येऊन तिचे हात-पाय बांधतात. तसेच, तोंडात वाद्य ठेवले जाते. त्यानंतर रोहित कनिकाला विजेच्या झटक्याची भीती दाखवतो आणि ती जोरजोरात ओरडू लागते.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

इतकेच नाही, तर प्रोमोमध्ये दिसते की, अभिनेत्रीच्या डोक्यावर मोठी कोळी (Spider) सोडण्यात येते. त्यानंतर ती रडू लागते. ती जितकी रडते, तितके वाद्य जास्त वाजते. त्यामुळे या टास्कला भीतीच्या सुरांचा राग असे नाव देण्यात आले आहे. इतर स्पर्धक कनिकाची ही स्थिती पाहून तिच्यावर हसू लागतात.

या व्हिडिओवर युजर्सने जोरदार कमेंट्स केल्या होत्या. चाहत्यांनी कनिकाची स्थिती पाहून तिला पाठिंबा देताना दिसत आहेत. दुसरीकडे, काही लोक जन्नत झुबेर (Jannat Zubair) हिच्या एलिमिनेशनची मागणी करत आहेत. या राऊंडसाठी चाहते श्रृती झा हिच्या डावाचीही वाट पाहत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-
बॉयफ्रेंड असावा तर असा! तेजस्वीने डोकं फोडून घेतल्यानंतर करणने ‘अशी’ घेतली काळजी, व्हिडिओ व्हायरल
दिशाचा ‘हा’ व्हिडिओ पाहून टायगर श्रॉफही होईल फिदा, तुम्हीही पाहा अभिनेत्रीचा सिझलिंग अंदाज
आख्ख्या जगाने काढलेली आठवण एकीकडे अन् पोटच्या लेकीने काढलेली आठवण दुसरीकडे, जान्हवीची भावूक पोस्ट व्हायरल

हे देखील वाचा