Monday, July 1, 2024

एकता कपूरने फाडला हाेता स्मृती इराणींचा कॉन्ट्रॅक्ट; वर्षांनंतर केला खुलासा, म्हणाली…

टीव्ही क्वीन एकता कपूरने आतापर्यंत अनेक सुपरहिट मालिका केल्या आहेत. ‘सास भी कभी बहू थी‘चे नाव एकताच्या सर्वाधिक लोकप्रिय शोच्या यादीत अग्रस्थानी आहे. अशात नुकतेच या मालिकेच्या रिलीजला 23 वर्षे पूर्ण झाली आहेत. या खास दिवशी एकता कपूरने ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’शी संबंधित एक मनोरंजक किस्सा सांगितला. काय आहे नेमका किस्सा? चला जाणून घेऊया…

‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’च्या 23व्या एनिवर्सरीनिमित्त, एकता कपूर (ekta kapoor) हिने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने शोचा टायटल ट्रॅक शेअर केला आहे. यासोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “साल 1994, मी माझी मैत्रिण शबीनाच्या घरी बसले होतो आणि पंडित जनार्दन यांनी मला तिथे पाहिले आणि सांगितले की, ‘माझी स्वतःची कंपनी असेल.’ मी त्यांना सांगितले की, मी माझी कंपनी ऑगस्टमध्ये सुरू करायच्या विचारात आहे.”

पंडितबद्दल बोलताना एकता कपूर पुढे म्हणाली, “त्यांनी मला सांगितले की, सर्व काही ठीक होईल, पण मला माझ्या 25 व्या वर्षाची वाट पाहवी लागेल. कारण, तेव्हा मी असा शो करेन की, लोक ज्याप्रकारे दूरदर्शनवर ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ पाहतात तसे ते माझा शाे पाहतील.” मी म्हणाले की, मी पौराणिक कार्यक्रम इतका चांगला करू शकेन असे वाटत नाही, पण बघूया.”

 

View this post on Instagram

 

A post shared by EktaaRkapoor (@ektarkapoor)

ती पुढे म्हणाली, “2000 साली ‘हम पाच’ला सहा वर्ष झाले होतो आणि समीर सरांनी मला एक नाटक देण्यास सांगितले हाेते. माझे दक्षिण भारतीय नाटक चांगले चालले होते आणि मला ते हिंदी वाहिनीवरही दाखवायचे होते, ज्यावर त्यांनी मला हो म्हटले. त्याच वर्षी मार्च 2000मध्ये, मी एका नवीन मुलीला मुख्य भूमिकेसाठी पाहिले हाेते, पण मी तिला टेपमध्ये पाहिल्यानंतर, मी तिचा कॉन्ट्रॅक्ट फाडला.”

एकता कपूरने या स्टाेरीमध्ये पुढे सांगितले की, “ज्या मुलीचा मी काॅन्ट्रॅक्ट फाडला हाेता ती स्मृती इराणी होती. अभिनेत्रीची टेप पाहिल्यानंतर, मी ठरवले की, तिला मुख्य भूमिकेत म्हणजेच ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’च्या तुलसी विराणीसाठी घ्यायचे आहे.” असे अभिनेत्रीने आपल्या पाेस्टमध्ये सांगितले. ( tv show kyunki saas bhi kabhi bahu thi ekta kapoor reveals she teared smriti irani contract to sign her as a lead )

अधिक वाचा-
करण जोहर नव्या प्रेमकथेसह परतला रुपेरी पडद्यावर, आलिया-रणवीरच्या चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज
किशाेरवयात तेजस्वीचा झाला हाेता विनयभंग; खुलासा करत म्हणाली,’मी रस्त्यावर एकटी हाेती अन् दोन मुलं…’

हे देखील वाचा