Monday, June 17, 2024

किशाेरवयात तेजस्वीचा झाला हाेता विनयभंग; खुलासा करत म्हणाली,’मी रस्त्यावर एकटी हाेती अन् दोन मुलं…’

तेजस्वी प्रकाश ही छाेट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे. अभिनेत्री सोशल मीडियावरही कायम सक्रिय असते. चाहेत देखील आपल्या लाडक्या अभिनेत्रीच्या आयुष्याशी संबंधित प्रत्येतक अपडेट जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. अशात सध्या तेजस्वी सर्वात लोकप्रिय शो ‘नागिन 6’ मध्ये मुख्य भूमिकेत आहे.

माध्यमाना दिलेल्या मुलाखतील, तेजस्वी प्रकाश (tejasswi prakash) हिने सांगितले की, ती किशोरवयात असताना तिचा विनयभंग झाला होता. या घटनेचे वर्णन करताना तेजस्वी म्हणाली, “दहावीनंतर, मी आणि माझी फ्रेंड जाॅगिंग करायचाे आणि नंतर आम्ही चिकन पॅटीज खायचो. अशात घरी जायच्या वेळी तिचे घर पहिल्यांदा यायचे म्हणून ती निघून गेली आणी मी माझ्या वाटेने जात हाेते. मात्र, नेमके त्यादिवशी दाेन मुलं आली आणि त्यांनी मला तिथे पाहिले. सकाळचे 6 वाजले हाेते त्यामुळे रस्त्यावर फारशी गर्दी नव्हती.”

अभिनेत्रीने पुढे सांगितले की, “त्या दोन्ही मुलांनी मला पाहिले आणि नंतर ते एकमेकांशी बोलू लागले. मी रस्त्यावर एकटी होते आणि ते माझ्याजवळून गेले, अशाप्रकारे ते वारंवार चक्रा मारत हाेते. एवढ्यात मी पटकन एका बिल्डींगकडे पळत गेले आणि गार्डने मला अडवले, पण मी त्याला विनंती केली की, मला आत जाऊ द्या, ज्यानंतर मी बिल्डिंगच्या बागेत पळत गेले आणि तिथे बरीच झाडे होती त्यामुळे मी त्या झाडांमध्ये अर्धा तास लपून बसले मग घरी जाण्यासाठी मुख्य रस्त्यावर परत आले.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Tejasswi Prakash (@tejasswiprakash)

अभिनेत्री पुढे म्हणाली, “मुले मला दुरून पाहत आहेत असे मला वाटायचे. मात्र, मी माझ्या घरी गेले, तर या मुलांना माझ्या लोकेशनबद्दल कळेल आणि घरी फक्त माझा लहान भाऊ आणि आई असायचे. म्हणून मी मुद्दाम माझ्या मैत्रिणीच्या घरी जायची. कारण, ते त्यांच्या भावांसोबत आणि संपूर्ण कुटुंबासह राहात असे. मला वाटले की, जर ही मुले माझ्या मागे या घरात आली, तर माझ्या फ्रेंडचे भाऊ त्यांना सांभाळून गेली. एक आठवड्यानंतर, मी पुन्हा बाहेर आणि अन् माझ बॅडलक म्हणजे मी तेच कपडे परिधान केले. मी टी-शर्ट आणि जीन्स घातली होती. संध्याकाळची वेळ होती आणि ही मुलं अजूनही त्यांच्या बाईकवर फिरत होती.”

पुढे तेजस्वीने सॉल्यूशनवर बाेलत सांगितले की, “मुलींना त्यांच्या आयुष्यात कोणकोणत्या संघर्षातून सामोरे जावे लागेल हे जाणून घेतले पाहिजे, जेणेकरून त्यांना प्रत्येक गोष्टीची जाणीव होईल.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Tejasswi Prakash (@tejasswiprakash)

तेजस्वीच्या वर्क फ्रंटविषयी बाेलायचे झाले, तर ती सध्या ‘नागिन 6’मध्ये मुख्य भूमिकेत आहे. ( tv actress tejasswi prakash was molested in teenage actress revealed two boys on bike chased her)

अधिक वाचा-
काजाेलची लेक न्यासा पॅपराझींना हाताळते ‘अशा’ प्रकारे; अभिनेत्री म्हणाली, ‘तिच्या जागी मी असते, तर…’
शिव ठाकरेची एक्स गर्लफ्रेंड अडकली विवाह बंधनात? जाणून घ्या सत्य

हे देखील वाचा