Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

अभिनेत्री निधी भानुशालीचा बोल्ड अवतार होतोय व्हायरल! साकारली होती सोनू भिडे भूमिका…

तारक मेहता का उलटा चष्मा हा मालिका विश्वातील आतापर्यंतचा सर्वात जास्त काळ चालणारा तसेच सर्वात यशस्वी ठरलेला शो आहे. बऱ्याचदा असं होतं की एखादी मालिका येते आणि जाते. त्यातील फक्त काही मोजक्या भूमिका आणि ती साकारणारे कलाकार सोडले तर इतर भूमिका आणि ते कलाकार काही आपल्या लक्षात राहत नाहीत. परंतु तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेच्या बाबतीत मात्र हे सगळं फोल ठरतं कारण या मालिकेतील जवळपास प्रत्येक भूमिका रसिक प्रेक्षकांच्या लक्षात राहते. कमालीची बाब म्हणजे ही भूमिका साकारणारे कलाकार कालांतराने बदलत गेले परंतु त्या भूमिकेवरील लोकांचं प्रेम काही कमी झालेलं नाही. ते गेली इतकी वर्षे आजतागायत तसंच कायम आहे.

या मालिकेतील अशीच एक सर्वांच्या आवडीची भूमिका आहे ती म्हणजे सोनूची! हो या गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी असलेल्या आत्माराम तुकाराम भिडे यांची एकुलती एक लेक सोनू हिची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री या टप्प्याटप्प्याने बदलत राहिल्या. म्हणजे अगदी सुरुवातीपासून या शोमध्ये जी बालकलाकार सोनूची भूमिका साकारत असे तिचं नाव होतं झील मेहता! परंतु अभ्यासाच्या कारणास्तव तिने ही मालिका सोडली आणि तिच्या नंतर निधी भानुशालीने ही भूमिका साकारली.

लोकांनी सोनुच्या भूमिकेत निधीला फक्त स्वीकारलंच नाही तर तिला भरभरून प्रेम देखील तितकंच दिलं. सलग सहा वर्षे ही भूमिका साकारल्यानंतर पुढील अभ्यासासाठी निधीने सुद्धा ही मालिका सोडली आणि आता या मालिकेत सोनूची भूमिका पलक सिधवाणी ही अभिनेत्री साकारत आहे आणि लोकही तिला हळू हळू सोनूच्या भूमिकेत स्वीकारू लागले आहेत.

निधी भानुशाली ही मालिका सोडल्यानंतर सोशल मीडियावर जास्त ऍक्टिव्ह राहत असते. अभ्यासासोबतच ती तिचे वेगवेगळे भन्नाट फोटो अपलोड करत असते. नुकतंच निधीने एक फोटोशूट केलं ज्याचे फोटोज तीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले. तिचे हे फोटोज इतके सुंदर आले आहेत की काही क्षणातच तिचे हे फोटोज व्हायरल होऊ लागले आहेत.

निधीच्या या फोटोजमध्ये तिने लाल रंगाचा टेलिफोन प्रॉप म्हणून वापरला असून तिने त्याचा वापर करत ज्यापद्धतीने फोटोजमध्ये एक्सप्रेशन्स दिले आहेत ते वाखाणण्याजोगे आहेत. निधीच्या या फोटोजमधून तिच्यात ठासून भरलेला बोल्डपणा हा उठून दिसतोय. तिच्या कातिल अदांनी केव्हाच लाखो तरुणांच्या हृदयावर घाव केले असतील यात तिळमात्रही शंका नाही. इन्स्टाग्रामवर निधीचे जवळपास पाच लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

हे देखील वाचा