काय सांगता! ‘तारक मेहता’ची दयाबेन अर्थात दिशा वाकानी आहे प्रेग्नंट? व्हायरल फोटो तर हेच सांगतायत


‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ गेल्या १३ वर्षांपासून प्रेक्षकांची पहिली पसंती आहे. त्यातील प्रत्येक पात्राने चाहत्यांना वेड लावले आहे. त्याच्या एका पात्राबद्दल मोठी बातमी समोर येत आहे. या शोमध्ये जिची आतुरतेने वाट पाहिली जात आहे, त्या दयाबेन अर्थात दिशा वाकाणीबद्दल एक नवीन बातमी समोर येत आहे. २०१७ पासून शोमध्ये दयाबेनची भूमिका करणारी दिशा वाकानी गायब आहे. मुलीच्या जन्मानंतर ती शोमध्ये दिसली नाही. तिच्या पुनरागमनाबद्दल अनेक अंदाज बांधले जात असले, तरी तिचे पुनरागमन किती दिवसात होईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दिशा वाकानी शोमधून आहे गायब

आता दिशाबाबत (Disha Vakani) मोठी बातमी समोर आली आहे. सध्या सोशल मीडियावर दिशा सक्रिय नाही. पण तिचे चाहते नक्कीच सक्रिय आहेत. जे तिच्याशी संबंधित माहिती आणि फोटो वेळोवेळी शेअर करत असतो. नुकतेच दिशाचे असे काही फोटो व्हायरल होत आहेत, जे पाहून चाहते वेडे झाले आहेत. दिशाच्या शोमध्ये परत न येण्याचे कारणही चाहत्यांना समजले.

फोटोंमुळे झाला खुलासा

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये दिशा एकदम हेल्दी दिसत आहे. तिला पाहून ती आई होणार आहे, याचा अंदाज बांधणे अवघड नाही. या फोटोमध्ये दिशासोबत तिचा पतीही दिसत आहे. तसेच ती काही फंक्शनमध्ये लोकांसोबत पोझ देत असते. दिशाच्या या पोस्टवर चाहते जबरदस्त प्रतिक्रिया देत आहेत. काही त्यांचे अभिनंदन करत आहेत, तर काही त्यांना विविध प्रकारचे प्रश्न विचारत आहेत. मात्र, हा फोटो लेटेस्ट आहे की, नाही हे या पोस्टवरून स्पष्ट झालेले नाही.

नुकतेच या शोमध्ये दयाबेनचे पती जेठालाल यांची भूमिका साकारणाऱ्या दिलीप जोशी यांच्या मुलीचे लग्न होते. ‘तारक मेहता’चे अनेक कलाकार या लग्नात सामील झाले होते, मात्र कोणी गायब होते, ती म्हणजे दिशा वाकानी. दिशाने दिलीप जोशी यांच्या मुलीच्या लग्न समारंभाला उपस्थित राहण्यास नकार दिल्याच्या बातम्या मीडियामध्ये आल्या होत्या. आता चाहत्यांचा अंदाज आहे की, दिशा कदाचित प्रेग्नेंसीमुळे मीडियासमोर आली नसेल.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!