Wednesday, June 26, 2024

‘द कपिल शर्मा शो’मध्ये कृष्णाच्या कॉमेडीवर सर्वच झाले लोटपोट; नोराला म्हणाला, ‘माझ्या आत्म्याला तिच्यासोबत…’

द कपिल शर्मा शो‘च्या पुढील भागाचा प्रोमो व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये गायक गुरु रंधावा आणि अभिनेत्री नोरा फतेही त्यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘डान्स मेरी रानी’ गाण्याच्या प्रमोशनसाठी पोहोचले आहेत. प्रोमो व्हिडिओमध्ये कपिल शर्माची विनोदी स्टाईल आणि कॉमिक टायमिंग प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही, तर कृष्णा अभिषेक देखील नोरासोबत फ्लर्ट करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

सर्वप्रथम, कृष्णा नोराच्या (Nora Fatehi) आकर्षक ऑफ-शोल्डर आउटफिटची प्रशंसा करतो आणि म्हणतो की, ”व्वा किती सुंदर ड्रेस आहे. हा ड्रेस परिधान करून तुम्ही लसीकरण करू शकता.” मग तो त्याच्या ऑन-स्क्रीन पात्र सपनाच्या गेटअपबद्दल तक्रार करतो आणि म्हणतो की, “असा पोशाख दिला की, त्याला तिच्यासोबत फ्लर्ट करावे लागेल आणि जो आतला आत्मा आहे, त्याला तिच्याशी फ्लर्ट करायचे आहे.”

कृष्णा अभिषेक व्यतिरिक्त शोचा होस्ट कपिल शर्मा (Kapil Sharma) देखील एपिसोडमध्ये नोरासोबत फ्लर्ट करण्याचा प्रयत्न करतो. या शोच्या प्रोमोला चाहत्यांनी सोशल मीडियावर खूप पसंती दिली आहे. वीकेंडची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याचवेळी, या वीकेंडला ‘आरआरआर’ चित्रपटाची टीम देखील कपिलच्या शोमध्ये दिसणार आहे.

नोराच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर ती सध्या उच्चांकावर आहे. अलीकडेच ‘भुज- द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटातील तिची भूमिका चाहत्यांना खूप आवडली होती. तसेच या चित्रपटात अजय देवगण (Ajay Devgan) तिच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसली. एवढेच नाही, तर नोरावर चित्रित केलेली गाणी सुपरहिट होत आहेत. तिची फॅन फॉलोविंग दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. नोराने ‘दिलबर’ आणि ‘गर्मी’ सारख्या गाण्यांनी आपली खास ओळख निर्माण केली आहे. नोरा ‘बिग बॉस’च्या घराचाही एक भाग राहिली आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा