Wednesday, June 26, 2024

कपिल शोमध्ये अनुपम खेरला पाहून युजर्स संतापले, काय आहे प्रकरण जाणून घ्या

कपिल शर्मा शो‘ त्याच्या नवीन सीझन आणि स्टार कास्टसह प्रेक्षकांच्या भेटीस परतला आहे. कपिलच्या शाेमध्ये एकामागून एक स्टार आपल्या चित्रपटाच्या प्रमाेशनसाठी हजेरी लावत आहे. या दरम्यान, अभिनेता अनुपम खेर देखील त्यांच्या ‘ऊंचाई‘ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनेक कलाकारांसह शोमध्ये पोहोचला. सोशल मीडियावर त्याने कपिल शर्मासोबतचे काही सुंदर फोटो शेअर केले, जे पाहून लोकांना ‘द काश्मीर फाइल्स‘चा वाद आठवला.

‘ऊंचाई’ (uunchai) हा चित्रपट 11 नोव्हेंबरला सिनेमागृहामध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात अनुपम खेर (anupam kher) याच्या व्यतिरिक्त अमिताभ बच्चन, (amitabh bachchan) बोमन इराणी, (boman irani) सारिका (sarika) आणि नीना गुप्ता (neena gupta) यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. इतर कलाकारप्रमाणेच, ऊंचाई चित्रपटाचे कलाकार देखील प्रमोशनसाठी कपिल शर्मा शोमध्ये पोहोचले, परंतु यावेळी मेगास्टार अमिताभ बच्चन त्यांच्यासोबत नव्हते. कपिल शर्मासोबत कलाकारांनी खूप मजा केली याची झलक अनुपम खेरने त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

या फोटोंमध्ये कपिल शर्मा अनुपम खेर यांना किस करताना दिसत आहे. त्याने फाेटाे पाेस्ट करत लिहिले, “या शोमध्ये येणे खूप मजेदार होते. या प्रेमाबद्दल कपिल आणि अर्चना यांचे आभार. मी इतका हसलो की माझा जबडा दुखायला लागला.” यासोबतच त्याने कपिल शर्माच्या संपूर्ण टीमचे आभार मानले. मात्र, अनुपम खेर यांचे हे फाेटाे काही साेशल मीडिया युजर्सच्या चांगलेच डाेळ्यात खुपसले आहे. या फाेटाेवर कमेंट करत ट्राेलर्सने लिहिले, “तुम्ही चांगले केले नाहीत, तुमच्याकडून या अपेक्षा नव्हत्या.”

काश्मीर फाइल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी कपिल शर्मावर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आपल्या शोमध्ये येण्यासाठी आमंत्रित न केल्याचा आरोप केला होता. प्रत्युत्तरात अनुपम खेर यांनी कपिलचे समर्थन केले. तो म्हणाला होता की, “चित्रपटाचा विषय खूप गंभीर आहे, त्यामुळे आम्हाला कॉमेडी शोमध्ये त्याचे प्रमोशन करायचे नाही.” त्यावेळी सोशल मीडियावर कपिल शर्मा शोला बाॅयकाॅट करण्यात आले हाेते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
दक्षिण केरलच्या 32 हजार महिला अपाहरण घटनेला ‘या’ चित्रपटाने दिला ऊजाळा, पाहाच एकदा ट्रेलर

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी ‘या’ ठिकाणी अडकणार लग्नबंधनात, समोर आली मोठी माहिती

हे देखील वाचा