अक्षय कुमारच्या मुलीने केले असे काही की, चाहतेही म्हणाले ‘सो क्युट’


बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना ही जोडी फारच प्रसिद्ध आहे. अक्षय त्याच्या चित्रपटात व्यस्त असतो तर दुसरीकडे ट्विंकलही सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. ती आपल्या खासगी आयुष्यातील क्षण आपल्या चाहत्यांसोबत नेहमीच शेयर करत असते. या दोघांना दोन मुलं आहेत. एक म्हणजे आरव आणि दुसरी नितारा. आपल्या लग्नाच्या इतक्या वर्षानंतर देखील आजही हे अक्षय आणि ट्विंकल प्रसिद्ध कपलपैकी एक गणले जातात.

आपल्या लेखनाची सुरवात वर्तमानपत्रापासून करणारी ट्विंकल हिने आपल्या लेखनातून अल्पावधीत वाचकांनी मने जिंकली. नेहमी काही ना काही व्हिडीओच्या माध्यमातून ती चाहत्यांशी संवाद साधत असते. आपल्या मुलीसोबत ती बऱ्याचदा क्वालिटी टाइम घालवते, सोशल मीडियावर देखील दिसत असते. नुकताच तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेयर केला आहे, ज्यात तिची मुलगी प्रेमाने आपल्या कुत्र्याला अंघोळ घालत आहे.

नितारा हिचे आपल्या कुत्रावर असलेले प्रेम चाहत्यांना खूपच आवडले आहे. ज्यात आठ वर्षाची ही छोटी मुलगी अत्यंत काळजीने आपल्या कुत्र्याच्या पाठीवरील फेस चोळताना दिसत आहे. ज्यात तो देखील अत्यंत शांततेने उभे राहून तिच्याकडून अंघोळ करवून घेत आहे. या व्हिडीओमध्ये ट्विंकलने आपल्या इन्स्टाग्रामवर शेयर करताना लिहिले आहे की, “अॅलेक्स केवळ त्याच व्यक्तीकडून स्क्रबिंग करून घेतो, जो त्याला चांगल्या प्रकारे बसवू शकेल.” या व्हिडिओवर चाहत्यांच्या ‘खूप गोड’, ‘खूप गोंडस’ तर एकाने काम असच ‘चालू राहू दे’ अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या आहेत.

ट्विंकल आणि नितारा या दोघांचेही पुस्तकांवर खूप प्रेम आहे. ट्विंकलने एकदा आपल्या मुलीसोबत पुस्तक वाचत असतानाचा एक फोटो शेअर केला होता. ज्यात तिने कॅप्शन दिले होते की,’आपल्या दोघांना एका दिवसात २५ पाने वाचायची आहेत.’ त्यावर ती तिला प्रश्न देखील करते. तेव्हा ती म्हणते की, ‘ आपल्याला स्वतःसाठी काम निश्चित करावे लागेल आणि लक्ष द्यावे लागेल की हे काम झाल्यावरच आपण उठू शकतो. त्यासाठी दिवसाची सुरवात चांगली करणे गरजेचे आहे. दररोज २५ पाने वाचणे हे मर्यादित नसून, काही वेळा ५ पाने देखील आपल्याकडून वाचली जातात.’

आपल्या मुलीसोबत ती आणि अक्षय नवनवीन व्हिडीओ किंवा फोटो शेयर करत असतात. मग ते एखाद्या शूट दरम्यान किंवा पतंग उडवताना का असेना. तिच्या आणि अक्षयच्या या प्रत्येक व्हिडीओवर चाहते भरभरून प्रेम व्यक्त करत असतात.

अभिनय क्षेत्रापासून स्वतःला दूर केल्यानंतर एक आदर्श पत्नी आणि आई म्हणून तिने स्वतःला सिद्ध केलं आहे. याशिवाय इंटिरियर डिझायनर, स्तंभलेखिका आणि लेखिका तसेच उद्योजिका म्हणूनही ती नावारूपास आली आहे. ट्विंकलने १९९५ मध्ये ‘बरसात’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते आणि ‘तीस मार खान’ हा तिचा शेवटचा चित्रपट होता. आपल्या पंधरा वर्षाच्या कारकिर्दीत तिने आजवर सतरा चित्रपटातून भूमिका साकारल्या आहे. ती स्वतःच्या प्रॉडक्शन हाऊसची सहमालकिन आहे. अक्षय कुमारचा ‘पॅडमॅन’ हा चित्रपट देखील तिच्याच प्रोडक्शनने बनवला होता.


Leave A Reply

Your email address will not be published.