Monday, June 9, 2025
Home बॉलीवूड ट्विंकल खन्नाने केले ‘वन मॅन आर्मी’ असलेल्या राखी सावंतचे कौतुक, राखीने मानले आभार

ट्विंकल खन्नाने केले ‘वन मॅन आर्मी’ असलेल्या राखी सावंतचे कौतुक, राखीने मानले आभार

बॉलिवूडमधील आयटम साँगसाठी प्रसिध्द असलेली अभिनेत्री ‘राखी सावंत’ने अभिनेत्री आणि लेखिका ‘ट्विंकल खन्ना’चे हात जोडून आभार मानले आहेत. ट्विंकल खन्नाने ‘ट्वीक इंडिया’वरील एका लेखात राखी सावंतचे कौतुक केले होते. यामुळे राखीने तिचे आभार मानले आहेत. राखी स्वतःला ‘वन वुमन आर्मी’ म्हणते. राखी म्हणाली की, ती अशी ‘वन वुमन आर्मी’ आहे की, ती ज्या गोष्टीवर विश्वास ठेवते, त्याच्यासाठी लढते.

राखीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर लिहिले की, “कितीही मस्करी करु द्या, तरी मी ठाम उभी आहे.” ती म्हणाली की, “मला ट्रोल केले गेले आणि शिवीगाळ केली. मस्करी केली आणि त्यानंतरही मी खंबीरपणे उभी राहीले.” ट्विंकलच्या लेखाला प्रतिसाद देताना राखीने स्वतःचे आणि ट्विंकलचा फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, “धन्यवाद ट्विंकल खन्ना, तू केलेले कौतुक माझ्यासाठी खूप आहे.” राखीने ट्विंकलला सांगितले की, “मौल्यवान वेळ काढून माझ्याबद्दल लिहिल्याबद्दल मी तुझे आभार मानते.”

पुढे राखीने लिहिले की, “मला अभिमान आहे की, मी माझी आणि माझ्या कुटुंबाची काळजी घेऊ शकते. लोकांच्या जीवनात हसणं आणि मनोरंजन आणून मी सर्व अडचणी दूर करू शकते … मला खात्री आहे की, ट्विंकल खन्ना सारखे नम्र होण्यासाठी आणि राखी सावंत सारखे होण्यासाठी लोखंडाच हृदय …”

राखी सावंत इंडस्ट्रीत तिच्या अनोख्या स्टाईलसाठी ओळखली जाते हे सर्वांनाच माहित आहे. तिच्या नखाऱ्याने ती सर्वांना हसत ठेवते आणि चर्चेचा विषय बनते. तिने या टप्प्यावर पोहोचण्यासाठी खूप संघर्ष केला आहे. ज्याबद्दल ती अनेकदा उघडपणे बोलते. हेच कारण आहे की, जेव्हा ट्विंकल खन्नाने तिच्या लेखात राखीचे कौतुक केले तेव्हा ती स्तब्ध झाली आणि तिने ट्विंकल खन्नाचे आभार मानले.

ट्विंकलने तिच्या लेखात लिहिले आहे की, “गेल्या अनेक वर्षांपासून राखी सावंतला इंडस्ट्रीमध्ये कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन, ड्रामेबाज आणि आयटम गर्ल इत्यादी अनुक्रमांसह अनेक नावांनी ओळखली जाते. ती स्वतःचे काम जागरूकतेने करत आहे.”

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सई ताम्हणकरचा समुद्रात जलवा; चाहते तर सोडाच, कलाकारांनीही पाडला कमेंट्सचा पाऊस

-‘नुसती क्यूट आहेस तू’, म्हणत वीणा जगतापच्या फोटोवर चाहत्याने केली लक्षवेधी कमेंट

-‘आये… तुझं हसणं हीच माझ्या आयुष्यातील खरी कमाई’, म्हणत सिद्धूकडून आईला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा!

 

 

 

हे देखील वाचा