‘बिग बॉस’ ओटीटीची सुरुवात दणक्यात झाली आहे. करण जोहर याचे सूत्रसंचालन करत आहे. शोची सुरुवात मलायका अरोराच्या परफॉर्मेंसने झाली. शोमध्ये १३ स्पर्धक आहेत, ज्यात ७ महिला – दिव्या अग्रवाल, रिद्धिमा पंडित, शमिता शेट्टी, मुस्कान जट्टाना, नेहा भसीन, अक्षरा सिंग आणि उर्फी जावेद. तर ६ पुरुष ज्यामध्ये राकेश बापट, करण नाथ, प्रतीक सहजपाल, निशांत भट, मिलिंद गाबा आणि झीशान खान यांचा समावेश आहे.
बिग बॉसच्या पहिल्याच दिवशी स्पर्धक प्रतीक सहजपाल आणि दिव्या अग्रवाल यांच्यात भांडण झाले. प्रवेशदरम्यान, प्रतीक सहजपालने दिव्या अग्रवालशसोबत असलेली जुनी भांडणे उघड केली. तसेच यावेळी तो थोडा आक्रमकही दिसत होता. तेव्हा करण जोहरने त्याला शांत केले. मात्र, नंतर दिव्या अग्रवाल आणि प्रतीक सहजपाल यांच्यात भांडण सुरू झाले. यावेळी दिव्याने त्याला शिवीगाळही केली. यापुर्वीही एका रियॅलिटी शोमध्ये प्रतीक आणि दिव्या यांच्यात भांडणं झाली होती.
बिग बॉसच्या घरातील सर्व स्पर्धकांनी मिळून प्रतीक आणि दिव्या यांच्यातील वाद शांत केला. शोच्या सुरुवातीला करण जोहरने सर्व स्पर्धकांना एक टीम तयार करण्यास सांगितली होती. प्रत्येकाने शोमध्ये आपला जोडीदार निवडला. पण दिव्या अग्रवाल एकटी पडली, तिला कोणताही साथीदार सापडला नाही. म्हणूनच ती आता संपूर्ण आठवड्यासाठी नामांकित झाली आहे.
दरवेळी प्रमाणे या वेळीही बिग बॉसच्या घराची रचना उत्तम प्रकारे करण्यात आली आहे. असे सांगितले जात आहे की, चित्रपट निर्माते ओमंग कुमार यांनी बिग बॉस ओटीटीचे घर डिझाइन केले आहे. माध्यमांशी बोलताना ओमंग कुमार यांनी सांगितले की, यावेळी बिग बॉसचे घर बर्याच प्रिंट्सने बनवले आहे. तसेच लाईटचा वापर जास्त केला आहे. ज्यामुळे स्पर्धकांसाठी सहा आठवड्यांसाठी कार्निवलसारखे दिसेल.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘महाराष्ट्राचा बहुरंगी, बहुढंगी तमाशा’, सोनाली कुलकर्णीच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित
-‘अब क्या कहे क्या नाम ले…’, म्हणत अंकिता लोखंडेने लावले जोरदार ठुमके; डान्स व्हिडिओ व्हायरल
-व्हिडिओ: टायगर श्रॉफने गायलेल्या पहिल्या हिंदी गाण्याचा दमदार टिझर प्रदर्शित