Sunday, March 22, 2026
Home हॉलीवूड युक्रेनचे राष्ट्रपती ‘वोलोदिमीर झेलेन्स्की’ यांच्या कॉमेडी सिरिजला मोठी डिमांड ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार स्ट्रीम

युक्रेनचे राष्ट्रपती ‘वोलोदिमीर झेलेन्स्की’ यांच्या कॉमेडी सिरिजला मोठी डिमांड ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार स्ट्रीम

रूस आणि युक्रेन यांच्यामध्ये सुरु असलेले युद्ध काही थांबण्याची चिन्हे दिसत नाही. जवळपास २० पेक्षा अधिक दिवस झाले या दोन देशांमध्ये युद्ध सुरु होऊन मात्र अजूनही कोणीच माघार घेत नाही. या दोन देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे अनेक लोकांना त्यांच्या प्राणांना देखील गमवावे लागले असून, असंख्य लोकं जखमी झाले आहेत. या युद्धामुळे युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की चांगलेच चर्चेत आले आहेत. युक्रेनवर आलेल्या या सर्वात मोठ्या संकटात जेलेंस्की एक हिरो म्हणून सर्वांसमोर आले आहेत.

या युद्धात झेलेन्स्की आपल्या देशाचे आणि देशातील नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी सतत प्रयत्नशील दिसत आहे. या संकटातही त्यांनी देशाची साथ सोडली नसल्याने संपूर्ण जगात त्यांचे कौतुक होत आहे. मात्र खूप कमी लोकांना माहित असेल की, झेलेन्स्की हे राष्ट्रपती होण्यापूर्वी एक विनोदवीर अर्थात कॉमेडियन होते. त्यांनी राष्ट्रपती होण्याआधी अनेक चित्रपट आणि सिरीजमध्ये काम केले आहे. यातलीच एक सिरीज म्हणजे ‘सर्व्हेंट ऑफ द पीपल’.

‘सर्व्हेंट ऑफ द पीपल’ या विनोदी सिरीजमध्ये जेलेंस्की यांनी एका टीचरची भूमिका साकारली होती, जिला नंतर राष्ट्रपती होण्याची संधी मिळते. ही सिरीज युक्रेनमध्ये तुफान गाजली. त्यामुळे या सिरीजचे तीन सिझन काढले गेले आणि तिघंही सिझन हिट ठरले. या सिरीजची लोकप्रियता बघता त्या सिरीजची स्पिन ऑफ द मूवी देखील बनवली गेली आणि ही ‘सर्व्हेंट ऑफ द पीपल’ सिरीज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आली आहे.

वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्या ‘सर्व्हेंट ऑफ द पीपल’ या सिरिजला मिळणारी लोकप्रियता बघता नेटफ्लिक्सने यासाठी पुन्हा एकदा ही सिरीज आणली आहे. नेटफ्लिक्सने यूएसने याबद्दल माहिती देताना सांगितले की, “तुम्ही मागणी केली आणि आम्ही पुन्हा घेऊन आलो आहोत. ‘सर्व्हेंट ऑफ द पीपल’ सिरीज नेटफ्लिक्स यूएसवर पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. २०१५ साली आलेल्या ‘सर्व्हेंट ऑफ द पीपल’ आलेल्या या सिरीजमध्ये झेलेन्स्की शिक्षकाच्या भूमिकेत असून, जो भ्रष्टाचाराच्या विरोधात व्हिडिओ बनवून व्हायरल करतो आणि नंतर राष्ट्रपती बनतो.”

‘सर्व्हेंट ऑफ द पीपल’ या सिरीजनंतरच झेलेन्स्की यांच्या राजनेतिक करिअरला सुरुवात केली. २०१९ साली वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी ७० टक्के मते घेऊन ते राष्ट्रपती झाले. झेलेन्स्की सध्या सुरु असलेल्या रूस आणि युक्रेनच्या युद्धामुळे तुफान गाजत आहे. ते ज्याप्रकारे आपल्या देशासोबत आणि नागरिकांसोबत ठामपणे उभे आहेत, ते पाहून सर्वच लोकं त्यांचे कौतूक करत असून, त्यांनी या युद्धामुळे त्यांना मिळालेल्या देश सोडण्याच्या ऑफरला देखील धुडकावले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा