दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री समंथा रूथ प्रभू पती नागा चैतन्याशी घटस्फोट घेतल्यापासून ती चर्चेत आली आहे. काही काळासाठी तिने सोशल मीडियापासून स्वत:ला दूर ठेवले होते. नंतर ती सोशल मीडियावर खूपच सक्रिय झाली. ती आता तिच्या चाहत्यांना प्रत्येक क्षणोक्षणी अपडेट्स देताना दिसत आहे. आज ती तिच्या उत्कृष्ट कामामुळे आणि नविन प्रोजेक्टसमुळे चर्चेत आहे. तिने नुकतीच एक जाहिरात शूट केली आहे. ज्यामध्ये अभिनेत्री अल्ट्रा ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. तिला पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.
समंथाने एका वेबरेज कंपनीसाठी शूट केले आहे. तिने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. तिने त्या पोस्टवर सुंदर कॅप्शनही दिले आहे, “मी मरण्यासाठी तयार आहे. कारण मी #Madeofpride नी बनलेली आहे. तुमच्या चाली दाखवा आणि #Madeofpride नृत्य युद्धात सामील व्हा जगाला दाखवा की, तुम्ही कोणत्या मातीचे बनलेले आहात आणि तुम्ही काय करु शकता.” तिचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे.
व्हिडिओमधील तिच्या लूकबद्दल सांगायचे झाले तर, ती दोन आउटफिटमध्ये दिसत आहे. सुरुवातीला ती पांढऱ्या रंगाच्या काॅर्सेट टॉप आणि पॅन्टमध्ये दिसत आहे. यासोबतच तिने डायमंड कट कानातले घातले आहेत. यानंतर ती लाल रंंगाचा ऑफ शोल्डर ब्रा आणि काळ्या लेदर पँटमध्ये दिसत आहे. दोन्ही लुक्समध्ये तिने न्यूड मेकअप केला आहे. आणि केस पोनिटेलमध्ये बांधले आहेत. तिच्या व्हिडिओवर चाहत्यांनी कौतुकाचा पाउस पाडला आहे. एका चाहत्यांने यावर कमेंट करून “ओह लाला,” असे लिहले आहे. आणखी एका चाहत्यांने लिहले आहे की, “मॅडम तुम्ही खूप गोंडस दिसत आहात. तुमचे हे दोन्ही आउटफिट्स सुंदर आहेत, असेच आनंदी राहा आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत.” काही लोकांनी तिला चक्क रानीच म्हणले आहे. तिच्या वर्कफ्रंटबद्दल नजर टाकली तर ती आता हैद्राबादमध्ये आहे ती तिच्या आगामी ‘यशोदा’ सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे.
दैनिक बोंबाबोंचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा