दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रूथ प्रभू जिममध्ये गाळतेय घाम, वर्कआऊट व्हिडिओ होतोय व्हायरल

या धावत्या जगात प्रत्येकजण आपापल्या शरीराची काळजी घेत असतो. आपले शरीर अस्ताव्यस्त वाढू नये आणि निरोगी रहावे यासाठी अनेकजण दररोज जिममध्ये घाम गाळतात. प्रत्येकाचे स्वप्न असतं की, आपले शरीर फिट असावे. मग यासाठी कितीही कष्ट घेण्यासाठी अनेकजण तयार असतात. मनोरंजन विश्वात देखील असंच काहीसं चित्र पाहायला मिळते. दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रूथ प्रभू देखील फिटनेस प्रेमींपैकी एक आहे. नुकताच आता समंथाचा एक वर्कआऊट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल.

फिल्मफेअरच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून समंथाचा एक वर्कआऊट व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये समंथा (Samantha Ruth Prabhu) जिममध्ये वर्कआऊट करताना दिसत असून, ती खूप जड वजन उचलताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून कोणीही आश्चर्यचकित होईल. या व्हिडिओमध्ये तिच्यासोबत तिचा जिम ट्रेनर देखील दिसत आहे.

समंथाचा हा व्हिडिओ शेअर करत त्याला कॅप्शन देखील दिले आहे. ज्यात लिहिले आहे की, “खाली जा किंवा घरी जा, समंथाने पावरफुल घामाच्या सेशनसोबत तिचा विकेंड सुरू केला आहे.” तिच्या या व्हिडिओला आत्तापर्यंत ७ हजारांहून अधिक व्ह्यूज आले आहेत. तर ५०० हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. चाहते तिच्या या व्हिडिओवर सतत कमेंट्स करून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

लवकरच हॉलिवूडमध्ये करणार पदार्पण 

समंथा लवकरच हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘ॲरेंजमेंट ऑफ लव्ह’मध्ये ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय तिचे चाहतेही तिच्या एन्ट्रीची वाट पाहत आहेत.

वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले, तर समंथा आणि नागा चैतन्य यांनी ३ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २०१७ मध्ये नागा चैतन्यसोबत लग्न केले. पण ऑक्टोबर २०२१ मध्ये दोघांनी वेगळे होण्याची घोषणा केली. चाहत्यांना हे जोडपे खूप आवडले आणि नात्याला तडा गेल्याची बातमी ऐकून सर्वजण निराश झाले.

‘पुष्पा’ चित्रपटात समंथाने पहिल्यांदाच आयटम साँग केले आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. समंथाचा डान्स चाहत्यांना खूप आवडत आहे. याच कारणामुळे या गाण्याचा व्हिडिओ देखील चाहत्यांमध्ये चांगलाच व्हायरल होत आहे. ‘पुष्पा’ हा चित्रपट तेलगू, तामिळ, हिंदी, मल्याळम आणि कन्नड अशा ६ भाषांमध्ये बनवण्यात आला आहे.

हेही वाचा :

‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या सेटवर अशाप्रकारे केले जाते कोरोना नियमांचे पालन, पाहा फोटो

कार्पोरेट लूक आणि ग्लॅमरस पूजा सावंत, फोटो पाहून चाहत्यांचे हरपले भान

सुपरस्टार महेश बाबूवर भडकले रश्मिका मंदानाचे चाहते, सोशल मीडियावर व्यक्त केला जातोय संताप

 

 

Latest Post